For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादा माणूस हरपला...

06:58 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
दादा माणूस हरपला
Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Advertisement

प्रतिनिधी/ पुणे

उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे धुरंदर नेते आणि जनमानसात ‘दादा’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात निधन झाले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. या दुर्घटनेत अजितदादांसह पाचजणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या या अकाली निधनामुळे राजकारणातील एका झपाटलेल्या आणि धडाडीच्या पर्वाचाच अस्त झाला आहे. अजितदादांच्या आकस्मित जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

Advertisement

दरम्यान, गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीतील विविध शासकीय कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच डीजीसीएने या भीषण अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवार हे बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला ‘लिअर जेट 45’ (न्न्ऊ-एएख्) या खासगी विमानान जात होते. फ्लाईट रडारच्या माहितीनुसार, या विमानाने सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उ•ाण केले होते. मात्र, सकाळी 8.45 च्या सुमारास विमानाचा रडारशी संपर्क तुटला आणि सकाळी 8:48 वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 11 च्या अगदी सुऊवातीला कोसळले. विमान धावपट्टीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याचा स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर एका क्षणात विमान जळून खाक झाले व अजित पवार यांच्यासह पॅप्टन सुमित कपूर, पॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा पाचजणांचा त्यामध्ये करुण अंत झाला.

बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या एका बाजूला जाऊन आदळले आणि मोठा स्फोट झाला. हे विमान मुंबईहून भाड्याने घेण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कोणालाही वाचवणे शक्मय झाले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी हे विमान हवेत काहीसे अस्थिर दिसत होते. विमान बारामती विमानतळाच्या परिसरात घिरट्या घालत होते. धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच हे विमान जमिनीवर जोरदार आदळले आणि मोठा स्फोट झाला. हा आवाज इतका प्रचंड होता की तो जवळच्या वस्त्यांमधील घरांपर्यंत ऐकू आला. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका बाजूला झुकले होते आणि स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडून आजूबाजूच्या घरांजवळ पडले.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, विमान धावपट्टीपासून साधारण 100 फूट उंचीवर असतानाच नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर काही क्षणांतच लागोपाठ चार ते पाच मोठे स्फोट झाले, ज्यामुळे विमानाला भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आणि सतत होत असलेल्या स्फोटांमुळे कोणालाही मदतीसाठी विमानाजवळ जाणे शक्मय झाले नाही, असेही सांगण्यात आले.

 अशी पटली मृतदेहाची ओळख

हातात असलेले घड्याळ, त्यांनी घातलेला गॉगल आणि जॅकेटमुळे अजित पवार यांचा मृतदेह ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट आणि घरात असलेले कपडे पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह ऊग्णवाहिकेत ठेवण्यात आले.

 कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडले

अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हा धक्का इतका तीव्र होता, की कुणालाच काही सूचत नव्हते. एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी कार्यकर्ते रडताना दिसले. संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आज आपल्यात नाही, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली.

 विकासाचे शिल्पकार

1991 पासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावरही त्यांची मजबूत पकड होती. अजित पवार यांची ओळख एक ‘स्पष्टवक्ता’ आणि ‘कामाचा माणूस’ अशी होती. सुऊवातीच्या काळात त्यांच्या परखड बोलण्यावर टीका झाली असली तरी त्यांच्या कामाची पद्धत पाहून बारामतीकरांनी त्यांचा स्वभाव मनापासून स्वीकारला. चुकीच्या गोष्टींना कधीही समर्थन न देणारे आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून समाजकारण करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या अचानक जाण्याने गेल्या तीन दशकांचा खंबीर राजकीय प्रवास थांबला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते : चाहत्यांच्या भावना

अजितदादांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बारामती तालुक्मयातील दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. सोमेश्वर, पणदरे, सुपा, आदी गावांमधून बारामतीकडे जाण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बारामतीकरांनी अजितदादांच्या निधनाच्या विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नक्की काय झाले, याची स्वत:च्या डोळ्यांनी खात्री करण्यासाठी गावागावातून हातातील कामे सोडून बारामतीमध्ये लोक जमले होते. तर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती. ‘दादा इतक्मयात जाऊच शकत नाही, अजून बरेच काम बाकी आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते. नियतीने असा अचानक घाला घातला,’ अशी भावना एका बारामतीकाराने व्यक्त केली.

 अपघाताचा थरार आणि तांत्रिक कारणे

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या दिल्लीस्थित कंपनीचे ‘लिअरजेट 45’ हे छोटे खासगी चार्टर विमान होते. कंपनीचे पॅप्टन व्ही. के. सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्या भागात असलेले खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे  वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसावा, ज्यामुळे विमानाचे क्रॅश लँडिंग झाले आणि भीषण स्फोट होऊन आग लागली.

 विमान कंपनी आणि मॉडेलचा वादग्रस्त इतिहास

या दुर्घटनेनंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनी आणि ‘लिअरजेट 45’ या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रŽ उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर 2023 मध्ये याच कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर धावपट्टीवर घसरून अपघात झाला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती, मात्र दोन वर्षांच्या अंतरात एकाच कंपनीच्या दोन विमानांचा महाराष्ट्रात अपघात होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. याशिवाय, लिअरजेट 45 या मॉडेलचा जागतिक इतिहासही अशुभ राहिला आहे. मेक्सिकोमध्ये 2008 आणि 2021 मध्ये अशाच प्रकारच्या विमानांचे भीषण अपघात झाले होते, ज्यात तिथल्या गृहमंत्र्यांसह अनेक जणांना प्राण गमवावे लागले होते, तर 2003 मध्ये इटलीमध्येही या मॉडेलचा अपघात झाला होता.

 चौकशीसाठी समिती

या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, बारामती विमानतळ पूर्वी एका खासगी ऑपरेटरकडे होते, ते अलीकडेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

  धाडसी निर्णय घेणारा राजकारणी

अजित पवार हे त्यांच्या धाडसी आणि कधीकधी वादग्रस्त निर्णयांसाठी नेहमीच चर्चेत राहिले. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जातो. तो प्रयोग केवळ 80 तास टिकला होता. त्यानंतर जुलै 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांनी शरद पवारांच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या गटालाच ‘खरी’ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांना बहाल केले.

Advertisement
Tags :

.