Kolhapur Crime| पाळेवाडीत रक्ताचं नातं रक्तानेच माखलं! सख्ख्या भावाच्या एका प्रहाराने होत्याचं नव्हतं झालं!
पाळेवाडीत भावानेच घेतला भावाचा जीव
गारगोटी : भुदरगड तालुक्यातीलपाळेवाडी येथे कौटुंबिक वादातून आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने गंभीर जखमी झालेल्या विजय श्रीपती देसाई (बय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संशयित दत्तात्रय
श्रीपती देसाई (वय २८) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुदरगड पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी फिर्यादी माया बिजय देसाई आणि त्यांचे पती विजय देसाई यांच्यात घरात किरकोळ बाद सुरू होता. यावेळी आरोपी दत्तात्रय देसाई तिथे आला आणि कोणत्याही कारणाशिवाय, पुढचा मागचा विचार न करता त्याने विजय देसाई केला.
या हल्ल्यामुळे विजय यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते जागीच बेशुद्ध पडले. जखमी अवस्थेत विजय यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले, त्यानंतर उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. दि १४ रोजी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत विजय यांची पत्नी माया देसाई यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.