For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकरला नेमबाजीत कांस्यपदक

06:55 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकरला नेमबाजीत कांस्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ चॅटेरॉ, फ्रान्स

Advertisement

जिगरबाज महिला नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देताना महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत कांस्यपदक पटकावले. 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला नेमबाजीत पहिले पदक तिने मिळवून दिले. यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने नेमबाजीतील शेवटचे ऑलिम्पिक पदक मिळविले होते. त्यावेळी रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात विजय कुमार व 10 मी. एअर रायफल नेमबाजीत गगन नारंग यांनी कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतरच्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांत भारताला नेमबाजीत पदक मिळविता आले नव्हते. 22 वर्षीय मनू भाकरने एकूण 221.7 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. कोरियाच्या किम येजीने 241.3 गुण घेत रौप्य व तिचीच देशवासी जिन ये ओहने 243.2 गुण घेत सुवर्णपदक पटकावले.

Advertisement
Advertisement
Tags :

.