For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय तिरंदाजी संघाला कांस्यपदक

06:43 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय तिरंदाजी संघाला कांस्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटेलिया

Advertisement

रविवारी येथे समाप्त झालेल्या विश्वचषक स्टेज-3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय रिकर्व्ह मिश्र संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने एकूण 4 पदकांची कमाई केली आहे. धीरज बोमादेवराने 2 कांस्यपदके मिळविली.

मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात धीरज बोमादेवरा आणि भजन कौर यांनी मेक्सिकोचा 5-3 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत महिलांच्या सांघिक कम्पाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा व्हेनाम, आदिती स्वामी आणि परणीत कौर यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर या स्पर्धेत शनिवारी प्रियांशने रौप्यपदक घेतले. भारताच्या अंकिता भक्तचे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील पहिले पदक थोडक्यात हुकले. तिला उपांत्य फेरीत चीनच्या सुवर्णपदक विजेत्या यांग झियाओलीकडून हार पत्करावी लागली.

Advertisement

Advertisement
Tags :

.