चौफेर विक्रीने शेेअरबाजारात घसरण सुरूच
सेन्सेक्स 460 अंकांनी घसरला, जागतिक बाजारांमध्येही दबाव, कच्चे तेल वधारले
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणच दिसून आली. सेन्सेक्स 460 अंकांनी तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 123 अंकांनी घसरत बंद झाला. जागतिक बाजारांमध्ये दबावाचे वातावरण होते. पश्चिम आशियात पुन्हा तणाव वाढल्याने कच्च्या तेलाचे दर 111 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 460 अंकांनी घसरून 73,249 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 123 अंकांनी घसरून 22,687 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 समभाग तेजीत होते. दिवसभरातील चढ-उतारानंतर देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांत मीडिया आणि ग्राहक वस्तू कंपन्यांचे समभाग गुरुवारी नुकसानीत होते. निफ्टी मीडिया निर्देशांक 2.35 टक्क्यांच्या लक्षणीय घसरणीसह बंद झाला. याव्यतिरिक्त, एफएमसीजी निर्देशांक 1.41 टक्क्यांनी घसरला. बुधवारच्या सत्रात तेजीत असणारा आयटी निर्देशांक मात्र गुरुवारी घसरणीत होता. ऑटोमोबाईल क्षेत्राचा ऑटो निर्देशांक 0.73 टक्के कमकुवत झाला होता. मेटल क्षेत्रातील शेअर्सही कमकुवत झाल्याने हा निर्देशांक 0.52 टक्के घसरणीत होता. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्सवरही गुरुवारच्या सत्रात दबाव होता. फार्मास्युटिकल शेअर्समध्ये खरेदी झाल्याने फार्मा निर्देशांक 0.12 टक्के वाढीसह बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही खालच्या पातळीवरून खरेदी झाली.
समभागांची कामगिरी
निफ्टीत बजाज फायनान्स, सिप्ला, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, सनफार्मा, अॅक्सिस बँक, लार्सन टुब्रो, अपोलो हॉस्पिटल, ग्रासिम, बीएसई, अदानी पोर्ट, भारती एअरटेल यांचे समभाग तेजीत होते. तर मिडकॅपमधील इंडियन हॉटेल्स, बाळकृष्ण इंडस्ट्रिज, पीबी फिनटेक, अरोबिंदो फार्मा, एसीसी, फोनिक्स मिल्स यांचे समभागही मजबूत होत बंद झाले. दुसरीकडे घसरणीत नेस्ले, इटर्नल, एचडीएफसी लाइफ, टाटा मोटर्स पीव्ही, रिलायन्स, एचडीएफसी बँक यांचा समावेश होता.

- बजाज फायनान्स 939
- अल्ट्राटेक सिमेंट 10975
- आयसीआयसीआय 1394
- सनफार्मा 1753
- स्टेट बँक 968
- भारती एअरटेल 1899
- अदानी पोर्ट 1756
- टाटा स्टील 172
- कोटक महिंद्रा 437
- एचसीएल टेक 1426
- बजाज फिनसर्व्ह 1685
- सिप्ला 1329
- विप्रो 190
- हॅवेल्स इंडिया 1075
- कॅनरा बँक 120

- रिलायन्स इंडस्ट्रीज 1176
- इटर्नल 304
- एचडीएफसी बँक 693
- पॉवरग्रिड कॉर्प 247
- ट्रेन्ट 2774
- इन्फोसिस 1151
- एशियन पेन्ट्स 2291
- आयटीसी 258
- भारत इले. 367
- महिंद्रा-महिंद्रा 2854
- टीसीएस 2503
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3600
- हिंदुस्थान युनि 1834
- मारुती सुझुकी 11198
- टेक महिंद्रा 1825
- टायटन 4360
- इंटरग्लोब एव्ही. 4619
- एनटीपीसी 301
- अॅक्सिस बँक 1208
- कोलगेट 1685
- वरुण बेव्हरेज 401
- कोल इंडिया 402
- श्रीराम फायनान्स 900
- बँक ऑफ बडोदा 235
- पॉवर फायनान्स 326
