हिमाचलमध्ये ट्रेकिंगवेळी ब्रिटिश पर्यटक दरीत
06:28 AM Mar 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
एसडीआरएफकडून बचावकार्य : गंभीर अवस्थेत तांडा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर
Advertisement
वृत्तसंस्था/ धरमशाळा
हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ त्रिउंड येथे ट्रेकिंग करताना एक ब्रिटिश पर्यटक दरीत कोसळला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. किरण एडवर्ड असे संबंधिताचे नाव असून तो आपल्या मैत्रिणीसोबत ट्रेकिंग करत होता. ट्रेकिंगवेळी त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत पडल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ टीमने तातडीने बचावकार्य सुरू केले. एसडीआरएफ टीमने जखमी परदेशी पर्यटकाला धरमशाळा येथील झोनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तांडा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.
Advertisement
Advertisement