For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून ब्रिटनचा नागरिक ताब्यात

06:41 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून ब्रिटनचा नागरिक ताब्यात
Advertisement

पोलिसांशी हुज्जत घालत हल्ला केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात नियम मोडून मंदिरात गोंधळ घातल्याप्रकरणी आणि पोलिसांशी बाचाबाची केल्याप्रकरणी एका ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली होती. थॉमस व्रेग शेल्डन असे संबंधिताचे नाव आहे. शेल्डनवर पोलिसांशी बाचाबाची केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेपूर्वी गेल्या आठवड्यात सी बीच पोलीस स्टेशनजवळ उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी एका पोलंडच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले होते.

Advertisement

जगन्नाथ मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. हे मंदिर करोडो लोकांच्या श्र्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरात प्रवेश आणि दर्शनासाठी काही नियम करण्यात आले असून ते येथे येणाऱ्या भाविकांना पाळावे लागतात. मात्र,  30 वषीय ब्रिटिश नागरिक थॉमस व्रेग शेल्डन चेहरा झाकून भाविकांसह मंदिरात प्रवेश करताना आढळून आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याने मंदिरात आलेल्या काही भाविकांशी गैरवर्तन करण्याबरोबरच पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी सांगितले. या  घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.