ब्रिटानियाचे सीईओ कोहलींचा राजीनामा
26 सप्टेंबर 2022 पासून कार्यरत : कंपनीचे समभाग घसरणीत
मुंबई : फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील कंपनी ब्रिटानियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि कार्यकारी संचालक रणजित सिंग कोहली यांनी राजीनामा दिला आहे. रणजित म्हणाले की, चांगल्या संधींसाठी कंपनी सोडली आहे. कोहली 26 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटानियाचे सीईओ म्हणून रुजू झाले होते. सीईओ कोहली यांचा 14 मार्च हा कंपनीमधील शेवटचा दिवस राहणार आहे. 6 मार्च रोजी ब्रिटानिया लिमिटेडने म्हटले आहे की, ‘कंपनीच्या संचालक मंडळाने रणजित सिंग कोहली यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि 14 मार्च रोजी कामकाजाच्या वेळेनंतर त्यांना कंपनीच्या सेवांमधून मुक्त केले जाणार असल्याचे स्पष्ट केले’.
एशियन पेंट्स, डोमिनोजमध्ये केली सेवा
ब्रिटानियाचे सीईओ होण्यापूर्वी कोहलीने ज्युबिलंट फूडवर्क्स, पोपेयेस, डंकिन, एशियन पेंट्स, कोका-कोला आणि डोमिनोज इंडिया येथे नेतृत्वाची पदे भूषवली आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, ब्रिटानियाचे सीएमओ अमित दोशी यांनी बिस्किट उत्पादक कंपनीत तीन वर्षे काम केल्यानंतर आपल्या पदावरून राजीनामा दिला.
समभागाची कामगिरी
या घोषणेनंतर, गुरुवारी कंपनीचे समभाग हे 0.68 टक्के घसरून 4,690 वर बंद झाले.