For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेला वायुतळाच्या वापरापासून ब्रिटन रोखणार

06:41 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेला वायुतळाच्या वापरापासून ब्रिटन रोखणार
Advertisement

इराणवरील हल्ल्यासाठी वापराची ट्रम्प यांची इच्छा : ब्रिटनचा नकार

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनने अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी स्वत:च्या वायुतळाचा वापर करण्यापासून रोखले आहे. अमेरिका या वायुतळांचा वापर करू इच्छित होता, परंतु ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष नाराज झाले आहेत. त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या चागोस बेटसमूह मॉरिशसला सोपविण्याच्या करारासाठीचे समर्थन मागे घेतले आहे.

Advertisement

अमेरिका इराणवरील हल्ल्यासाठी डिएगो गार्सिया आणि ब्रिटनच्या आरएएफ फेयरफोर्ड वायुतळाचा वापर करू इच्छित आहे. डिएगो गार्सिया, चागोस बेटसमुहावरील सर्वात मोठे बेट आहे. 1970 च्या दशकापासून हे ब्रिटन आणि अमेरिकेचा संयुक्त सैन्यतळ राहिले आहे. जुन्या करारांनुसार ब्रिटिश पंतप्रधानांनी अनुमती दिली तरच ब्रिटनच्या कुठल्याही सैन्यतळाचा वापर केला जाऊ शकतो.

चागोस बेटसमूह सोडणे मोठी चूक

ट्रम्प यांनी चागोस बेटसमुहावरून ब्रिटनवर टीका केली आहे. 100 वर्षांचा भाडेकरार कुठल्याही देशाप्रकरणी योग्य निर्णय नाही. डिएगो गार्सियासारखे ठिकाण सोडणे अत्यंत मोठी चूक ठरेल. इराणने अमेरिकेसोबत करार न केल्यास अमेरिकेला हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया आणि फेयरफोर्डच्या वायुतळांचा वापर करावा लागू शकताहे. अशास्थितीत या तळांचे नियंत्रण अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ब्रिटन सरकारची भूमिका

मॉरिशससोबत करार सुरक्षेच्या कारणांमुळे आवश्यक आहे. यामुळे दीर्घ आणि महाग कायदेशीर वादापासून वाचता येणार असल्याचे ब्रिटनच्या सरकारचे म्हणणे आहे. या पूर्ण करारावर 4 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. ब्रिटनने 1814 मध्ये नेपोलियनला पराभूत केल्यावर चागोस बेटसमुहावर कब्जा केला होता. 1965 मध्ये या बेटसमुहाला मॉरिशसपासून वेगळे करत ‘ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र’ घोषित करण्यात आले होते. 1968 मध्ये मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाल्यावर हा बेटसमूह मॉरिशसला परत करण्याचे ठरले होते. नंतर डिएगो गार्सियावर अमेरिका आणि ब्रिटनने मिळून एक संयुक्त सैन्यतळ स्थापन केला होता.

डिएगो गार्सिया ठरणार महत्त्वपूर्ण

इराणवर हल्ल्यासाठी डिएगो गार्सिया महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण हे हिंदी महासागरादरम्यान असलेला एक मोठा सैन्यतळ आहे. येथून अमेरिका दूर अंतरापर्यंत आणि वेगाने सैन्यमोहीम राबवू शकतो. येथून इराणची राजधानी तेहरानपर्यंतचे अंतर 3800 किमी आहे. अत्यंत अधिक अंतर असल्याने अमेरिका येथून कुठल्याही थेट धोक्याच्या कक्षेत न येता दीर्घ पल्ल्याचे अभियान सुरू करू शकतो. या तळावर मोठी धावपट्टी असल्याने येथून मोठी बॉम्बवर्षक विमाने म्हणजेच बी-2 आणि बी-52 झेपावू शकतात.

Advertisement
Tags :

.