युक्रेनला मोठी सैन्य मदत देणार ब्रिटन
रणगाडाविरोधी माइन्स, लाखो ड्रोन्स देण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
युक्रेन आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धात आता युरोपीय देश युक्रेनला अधिक मदत देत आहेत. ब्रिटनने युक्रेनला 450 दशलक्ष पाउंडची सैन्य मदत देणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. हे सहाय्य युक्रेनच्या संरक्षणाला मजबूत करणे आणि भविष्यात कुठल्याही शांतता करारापूर्वी त्याला मजबूत स्थितीत आणण्यासाठी केले जात आहे.
या सहाय्यापैकी 350 दशलक्ष पाउंड ब्रिटनच्या यंदाच्या 4.5 अब्ज पाउंडच्या सैन्य सहाय्य पॅकेजमधून देण्यात येणार आहेत. याचबरोबर नॉर्वेही या पॅकेजमध्ये स्वत:चे योगदान देणार आहे. ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हीली आणि जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी ब्रसेल्समध्ये ‘युक्रेन डिफेनस कॉन्टॅक्ट ग्रूप’च्या बैठकीचे अध्यक्षत्व केले. हा ग्रूप नाटो आणि अन्य सहकारी देशांचा एक समूह असून तो युक्रेनला सहाय्य करत आहे.

मदतीत मिळणार शस्त्रास्त्र , ड्रोन
या सहाय्य पॅकेजच्या अंतर्गत युक्रेनला शस्त्रास्त्रs आणि उपकरणांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी आवश्यक सामग्री मिळणार आहे. तसेच यात रडार सिस्टीम, रणगाडाविरोधी माइन्स आणि लाखोंच्या संख्येत ड्रोन्स सामील असणार आहेत. युक्रेनला मजबूत स्थितीत आणून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी युक्रेन डिफेन्स कॉन्टॅक्ट ग्रूपचे काम अत्यंत आवश्यक आहे. आम्ही शांततेला धोक्यात टाकू इच्छित नाही, याचमुळे हे मोठे सहाय्य पॅकेज युक्रेनच्या संरक्षण क्षमतेला मजबूत करेल असे उद्गार ब्रिटनचे संरक्षणमंत्री हीली यांनी काढले आहेत.
शांतता करारासाठी होतेय तयारी
ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वात गुरुवारी एक विशेष बैठक झाली, ज्याला ‘कोएलिशन ऑफ द विलिंग’ म्हटले गेले. या बैठकीत युद्ध समाप्त होण्याच्या स्थितीत शांतता राखण्यासाठी तयार असलेल्या देशांचे संरक्षणमंत्री सामील झाले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार झाला तर त्वरित तेथे स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे. यात शांतिसैनिकांची भूमिका, सुरक्षाव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर विचार केला जात आहे.