कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या निर्णयाला ब्रिटनची साथ

06:22 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रिटिश खासदारांनी दिले समर्थन : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला जगभरातून समर्थन मिळत आहे. ब्रिटनच्या अनेक खासदारांनी देखील भारताचे समर्थन केले आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. भारत या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जी कारवाई करेल, त्याला आमचे समर्थन असेल असे ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी म्हटले आहे. तर भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार तनमनजीत सिंह धेसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी असे उद्गार काढले आहेत.

लंडन येथील इंडिया हाउसमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आम्ही येथे स्वत:चे दु:ख व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. कुठलाही दहशतवादी हल्ला हा मानवतेवरील हल्ला असतो. हा दहशतवादी हल्ला लोकांसोबत त्यांच्या धर्माच्या आधारावर द्वेष केला जात असल्याचे दाखवून देतो आणि हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही. हाउस ऑफ कॉमन्समध्ये पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले जाऊ नये, तर भारत या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जी पावले उचलेल त्याला पूर्ण समर्थन द्यावे असे आवाहन ब्रिटनच्या सरकारला केले आहे. परंतु यातून संघर्ष पेटण्याचाही धोका आहे. पीडितांबद्दल माझ्या संवेदना आहेत, सर्व हिंदूंबद्दल माझ्या संवेदना आहेत असे बॉब ब्लॅकमॅन यांनी म्हटले आहे.

9 वर्षांपूर्वी मी काश्मीर येथे गेलो होतो, त्यावेळी तेथील नैसर्गिक सौंदर्याने मनावर छाप पाडली होती. दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील पर्यटन संपवू पाहत आहेत, परंतु आम्ही असे करण्याची अनुमती त्यांना देऊ शकत नाही. दहशतवाद्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जावे किंवा त्यांचा खात्मा केला जावा.  ब्रिटन सरकार याप्रकरणी भारताला साथ देईल अणि भारताच्या सैन्य कारवाईचे समर्थन करेल असे माझे मानणे असल्याचे ब्रिटिश खासदाराने नमूद केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला भ्याड कृत्य

कार्यक्रमात ब्रिटनच्या अन्य खासदार कॅथरीन वेस्ट देखील सामील झाल्या. कॅथरीन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्दोष नागरिकांवरील भ्याड हल्ला ठरविले आहे. भारतीय वंशाचे तनमनजीत सिंह धेसी यांनी ब्रिटिश संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भ्याड संबोधित याच्या सूत्रधारांवर टीका केली आहे. या अवघड काळात ब्रिटन सरकारच्या संवेदना पीडितांसोबत असल्याचे उद्गार अन्य ब्रिटिश खासदार लूसी पावेल यांनी काढले आहेत.

भारतीय उच्चायोगाकडून कार्यक्रमाचे आयोजन

ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायोगाने 22 एप्रिल रोजीच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पीडितांना स्मरण करण्यासाठी इंडिया हाउसमध्ये स्मृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमॅन आणि अन्य खासदरांसह अनेक विशिष्ट अतिथी स्वत:च्या संवेदना आणि समर्थन व्यक्त करण्यासाठी एकत्रित झाले.

ब्रिटनच्या खासदारांच्या उपस्थितीने दहशतवादाची निंदा करणे आणि दहशतवाद विरोधात एकजूट होण्याच्या संयुक्त प्रतिबद्धतेला अधोरेखित केले आहे. या कार्यक्रमात ब्रिटनमधील अनिवासी भारतीय सामील झाले. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम  दोराईस्वामी यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना अशा संकटांसमोर लवचिकता, एकता आणि न्यायाच्या महत्त्वावर जोर दिला आहे.

लंडन उच्चायोगाबाहेर निदर्शने

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात लंडन येथील भारतीय उच्चायोगाबाहेर लोक एकत्र आले आणि त्यांनी भ्याड हल्ल्याची तीव्र निर्भत्सना केली आहे. यादरम्यान लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि भारताचा ध्वज फडकविला आहे. या हल्ल्याच्या विरोधात कठोरातील कठोर पाऊल उचलण्याचे आवाहन भारतीय वंशाच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. तसेच दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात या जमावाने घोषणाबाजी केली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article