For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गुलामीच्या इतिहासावर ब्रिटनकडून खेद

06:41 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुलामीच्या इतिहासावर ब्रिटनकडून खेद
Advertisement

आठवण झाली की मन सुन्न होते“ :किंग चार्ल्स तृतीय यांचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनच्या गुलामांच्या व्यापारातील ऐतिहासिक भूमिकेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. गुलामांच्या व्यापारातील ब्रिटनची भूमिका हा इतिहासातील लज्जास्पद भाग असल्याचे सांगत, त्याची आठवण झाली की मन सुन्न होते आणि दु:ख होते, असे त्यांनी म्हटले. अँटिग्वा आणि बार्बुडा येथे राष्ट्रकुल देशांच्या नेत्यांच्या बैठकीला सुऊवात करताना त्यांनी  हे वक्तव्य केले. पॅरिबियन देश ब्रिटनकडे गुलामीच्या इतिहासाबद्दल औपचारिक माफी आणि नुकसानभरपाईची मागणी करत असताना चार्ल्स यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

Advertisement

गुलामीचा इतिहास आजही पॅरिबियन देशांसह राष्ट्रकुलातील अनेक सदस्यांवर परिणाम करत असल्याचे चार्ल्स यांनी सांगितले. आपल्या पूर्वजांनी चांगली कामे केली, तसेच चुका आणि अन्यायही केले. त्यांचा इतिहास बदलता येत नसला, तरी त्यातून शिकता येते, असे ते म्हणाले. अन्यायाविऊद्ध धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढा देता येतो, असे सांगत त्यांनी गुलामांच्या व्यापाराच्या उच्चाटनात ब्रिटिश रॉयल नेव्हीने बजावलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला.

माफी अन् नुकसानभरपाईची मागणी

गुलामीच्या काळात त्यांच्या नागरिकांचे आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचे पॅरिबियन देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्रिटनने आपल्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल माफी मागावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी राष्ट्रकुल देशांची औपचारिक माफी मागण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करू शकते, असे म्हटले आहे. मात्र, नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राजाच्या अधिकारात नसून तो ब्रिटिश सरकारचा विषय असल्याचे बकिंगहॅम पॅलेसने स्पष्ट केले आहे.

ब्रिटनने 32 लाख आफ्रिकी लोकांना गुलाम बनवले

1500 ते 1800 या काळात ब्रिटनने आफ्रिकेतील लोकांना पकडून गुलाम बनवले आणि आपल्या वसाहतींमध्ये पाठवले. या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश संसदेने अनेक कायदेही केले होते.

- ट्रान्सअटलांटिक स्लेव्ह टेड डेटाबेसनुसार, ब्रिटनने सुमारे 32 लाख आफ्रिकी लोकांना अटलांटिक महासागर पार नेऊन गुलाम बनवले.

- युरोपीय देशांनी मिळून 1 कोटी 25 लाखांहून अधिक आफ्रिकी लोकांना पकडून गुलामीसाठी विकले.

- ब्रिटनने 1807 मध्ये गुलामांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. 1833 मध्ये गुलामी संपवण्याचा कायदा केला, जो 1834 पासून लागू झाला.

- गुलामांना पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासाठी 1838 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

गुलामांना नव्हे, मालकांना दिली नुकसानभरपाई

गुलामी संपवण्याचा कायदा लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने गुलाम बनवलेल्या लोकांना नव्हे, तर त्यांच्या मालकांना नुकसानभरपाई दिली. त्यासाठी सरकारने 2 कोटी पौंड खर्च केले. ही रक्कम त्या काळातील ब्रिटनच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या सुमारे 40 टक्के होती. या नुकसानभरपाईसाठी ब्रिटिश सरकारने घेतलेले कर्ज फेडण्यास 2015 पर्यंतचा काळ लागला.

Advertisement
Tags :

.