युरोपीय महासंघात पुन्हा सामील होण्यास ब्रिटन इच्छुक
पंतप्रधान बर्नहॅम यांचे वक्तव्य
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान एंडी बर्नहॅम यांनी ब्रिटन पुन्हा युरोपीय महासंघात सामील होण्याची शक्यता वर्तविली आहे. युरोपीय महासंघासोबत संबंध वाढविण्याच्या अनेक पर्यायांवर आम्ही विचार करत आहोत. अधिक नुकसान टाळण्यासाठी युरोपीय महासंघात सामील होणे चांगला पर्याय असू शकतो, असे बर्नहॅम यांनी सत्तारुढ लेबर पार्टीच्या वार्षिक संमेलनाला संबोधित करताना सांगितले आहे. बर्नहॅम हे 2016 साली जनमत चाचणीदरम्यान देखील युरोपीय महासंघात कायम राहण्याच्या मताचे होते. तर यापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ब्रिटन युरोपीय महासंघात परतण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. मॅक्रॉन आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी ब्रिटनचा युरोपीय महासंघातील वापसीचा विचार स्वागतार्ह असल्याचे नमूद केले आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय ज्या उद्देशांसाठी घेतला होता, ते मागील 10 वर्षांमध्ये पूर्ण झालेले नाहीत. याचमुळे आम्हाला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे बर्नहॅम यांनी म्हटले आहे.