For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काकती मैदानात चटकदार कुस्त्या

10:09 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
काकती मैदानात चटकदार कुस्त्या
Advertisement

वार्ताहर/काकती

Advertisement

काकती येथे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात  प्रमुख कुस्ती नागराज बशीडोणी विरुद्ध उदय दिल्ली यांच्यात झालेल्या कुस्तीत तब्बल 26 मिनिटांनी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. त्यामुळे कुस्ती शौकिनांत नाराजी पसरली. सदर कुस्त्यांमध्ये कुस्तीपटूनी डोळ्याचे पारणे फेडली. काकती येथील अष्टगीर आमराईच्या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती उद्योजक शिवाजी लोहार आणि मनोहर शेखरगोळ यांच्या हस्ते नागराज बशीडोणी विरुद्ध उदय दिल्ली लावण्यात आली. दोन्ही पैलवानांनी प्रारंभी एकमेकांची ताकद आजमावली. झटापटीत हाताने एकेरीपट काटून एकलांगी भरुन उदय दिल्लीला चित करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्या 4 मिनिटाच्या नागराज बशीडोणी याने उदय दिल्लीला खाली खेचून घुटना ठेऊन मानेचा कस काढला. मात्र त्यातून लगेच सुटका उदयने करुन घेतली. तीन वेळा नागराज बशीडोणीचा डाव उधळून लावण्यासाठी उदयने पायाला आकडी लावून चित करण्याचा अपयश आले.  ताकदीच्या जोरावर उदयचे डाव उधळून लावत मोठ्या कौशल्याने नागराज बशीडोणीने खाली चीत पाडण्याच्या प्रयत्नात केला.  26 मिनिटानंतर पंच विश्वनाथ पाटील आणि कृष्णा पाटील यांनी कुस्ती बरोबरीत सोडविली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उद्योजक सुरेश चार्जगौडा यांच्या हस्ते  प्रकाश इंगळी विरुद्ध अमर पाटील कोल्हापूर लावली. प्रकाश व अमर हे दोघे आक्रमक खेळत होते. पहिल्या  अमर पाटीलने प्रकाश इंगळगीला धक्का घिस्सा मारून खाली घेण्याचा प्रयत्न केला. प्रकाश इंगळगीने सावधानतेने एकेरी पट काढून खाली घेतले पण अमर पाटीलने सुटका करुन घेतली. प्रकाशने पायला आकडी लावून खाली खेचून घेत 12 मिनिटात अमर पाटीलला लपेट डावावरती आसमान दाखविले.  पंच कृष्णा पाटील यांनी विजयी घोषित केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कार्वे आणि सतपाल नागटिळक कोल्हापूर 17 मिनिटे अटीतटीची झाली. मात्र सतपाल नागटिळक पायाला दुखापत झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती स्टेट बँकचे निवृत्त पर्यवेक्षक भरमा गवी यांच्या हस्ते पार्थ पाटील कंग्राळी विरुद्ध विजय बिचकुले कोल्हापूर लावण्यात आली. कुस्ती डाव प्रतिडावाने झुजली. शेवटी पंच शिवाजी पाटील यांनी बरोबरीत सोडविली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती संभाजी परमोजी काकती विरुद्ध नितीन कुऱ्हाडे कोल्हापूर याने घिस्सा डावावरती संभाजीला पराभूत केले. रामदास मोळेराखी काकतीने सुमित जाधव कोल्हापूरला अवघ्या 3 मिनिटात मोळी डावावरती चीतपट केले.

Advertisement

विशेष कुस्ती राजू गवीने राहूल पाटीलला अवघ्या 2 मिनिटात एकेरी पट काडून चीतपट केले. प्रेम जाधव आणि आशुतोष पाटील यांची कुस्ती 10 मिनिटाने बरोबरीत सुटली. पवन चिक्कीकोपने रफिक शिंदनट्टीवर मोळी डावात विजय मिळविला. कार्तिक इंगळीने बजरंग माने कोल्हापूरवर दुहेरी पट काढून पराभूत केले. जयवंत निलजकर काकतीने ओमकार पाटीलने डंकी डावात विजय मिळविला. यासह सुशांत टुमरी, प्रज्वल कडोली आदर्श खुर्द कंग्राळी, गणेश कडोली, रोहण कडोली, अक्षय कडोली आदी नवोदित मल्लानी चटकदार कुस्त्या खेळून कुस्ती शौकिनांकडून वाहव्वा मिळविली. आखाड्याचे पूजन देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सिदाप्पा गाडेकर, देवस्की पंच बसवाणी टुमरी तर लक्ष्मण मुचंडीकर यांनी श्रीफळ वाढविले. आखाड्यातील पंच संभाजी कडोलकर, बसवाणी निलजकर, शिवाजी धायगेंडे, बबन येळ्ळूर, मालोजी येळ्ळूर यांनीही कामकाज पाहिले. तर व्यवस्थापन लक्ष्मण पाटील, सुरेश यांनी तर समालोचन कृष्णार्थ चौगुले राशिवडे कोल्हापूरचे यांनी केले. कुस्त्यांचे मैदान यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंच मंडळाने परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.