महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नजमुल हुसेनचे शानदार शतक, बांगलादेश 3/212

06:13 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशकडे 205 धावां

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्हेट, बांगलादेश

Advertisement

येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने 68 षटकांत 3 गडी गमावत 212 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडे आता 205 धावांची भक्कम आघाडी असून खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान, कर्णधार नजमुल हुसेन शांतोने शानदार शतकी खेळी साकारताना नाबाद 104 धावा फटकावल्या. दिवसअखेरीस शांतो 104 तर मुशफिकुर रहीम 43 धावांवर खेळत होते.

प्रारंभी, न्यूझीलंडने 8 बाद 266 धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार टीम साऊदीने 62 चेंडूत 35 तर काईल जेमिसनने 70 चेंडूत 23 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 101.5 षटकांत 317 धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने 4 तर मोमिनल हकने 3 बळी मिळवले. बांगलादेशने पहिल्या डावात 310 धावा केल्या होत्या तर न्यूझीलंडने 317 धावा करत पहिल्या डावात केवळ 7 धावांची नाममात्र आघाडी मिळवली.

नजमुल हुसेनचे नाबाद शतक

बांगलादेश संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर महमुदुल हसन जॉय आणि झाकीर हसन यांनी अनुक्रमे 8 आणि 17 धावा करून विकेट गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार शांतो फलंदाजीला आला. त्याने संयमी खेळी करत शतकापर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाखेर शांतो 193 चेंडूत 104 धावांवर नाबाद आहे. मोमिनुल हकने चौथ्या क्रमांकावर खेळताना 40 धावा करून विकेट गमावली. तर मुशफिकूर रहिम 43 धावांसह नाबाद आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 68 षटकांत 3 बाद 212 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडे आता 205 धावांची भक्कम आघाडी असून आज चौथ्या दिवशी बांगलादेशचे प्रदर्शन निर्णायक ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 310 व दुसरा डाव 68 षटकांत 3 बाद 212 (जॉय 8, झाकीर हसन 17, शांतो खेळत आहे 104, रहिम खेळत आहे 43, पटेल 94 धावांत 1 बळी). न्यूझीलंड पहिला डाव 101.5 षटकांत सर्वबाद 317.

टीम साऊदीच्या कसोटीत दोन हजार धावा पूर्ण

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने 62 चेंडूत 35 धावा केल्या. यादरम्यान, त्याने कसोटीत 2000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. साऊदीने आतापर्यंत एकूण 95 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 135 डावांमध्ये 6 अर्धशतकांसह 2011 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा कर्णधार टीम साऊदी हा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हॅडली आणि डॅनियल व्हिटोरी यांनी कसोटीत दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article