For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिजेश पटेलची बेळगावला धावती भेट

09:50 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिजेश पटेलची बेळगावला धावती भेट
Advertisement

बेळगाव : बेळगाव येथील केएससीए क्रिकेट मैदानावरती भारतीय क्रिकेट मंडळाचे सभासद व आयपीएल संघटनेचे माजी सचिव ब्रिजेश पटेल व केएससीएच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावच्या केएससीए मैदानाची पाहणी करून मैदान आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यासाठी सज्ज झाल्याने समाधान व्यक्त करून पुढील कामकाज लवकरच सुरू करण्याचे आश्वासन ब्रिजेश पटेल व केएसतीएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट मैदानावरती आज सकाळी बीएसएचे सभासद व आयपीएलचे माजी सचिव ब्रिजेश पटेल, केएससीएचे सभासद मलिकार्जुन, स्वामी, खजिनदार सुधाकर, एस. व्ही. शेट्टी, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक निखिल भूषण, माजी समन्वयक अविनाश पोतदार, प्रसन्ना सुठंणकर, दीपक पवार, व्यंकटेश, महावीर, चेतन बैलूर, प्रकाश मिर्जा, स्पर्धा समितीचे सभासद बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सर्व सभासदांनी मैदानाची व खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर क्लब हाऊस, जलतरण तलाव, व खोल्यांची पाहणी केली. बेळगावचे मैदान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाले असून पुढील काळात आंतरराष्ट्रीय सामने भरवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या कामाची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित काम पुढील बैठकीत आपण मांडून येत्या क्रिकेट हंगामात सर्व कामे पूर्ण करण्यात येतील याची आश्वासनही यावेळी दिली. यापूर्वीही या मैदानात आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. बेळगावच हवामान क्रिकेटपटूंना पोषक असून पुढील हंगामापासून जास्तीत जास्त सामने या मैदानावरती घेतले जातील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे मत ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे केएससीएच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मैदानासाठी लागणारी सोई सवलती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती दिली. प्रारंभी धारवाड विभागाचे माजी समन्वयक अविनाश पोतदार यांनी ब्रिजेश पटेल व सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.