For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिजभूषण शरण सिंग निर्दोष मुक्त

06:23 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रिजभूषण शरण सिंग निर्दोष मुक्त
Advertisement

लैंगिक छळप्रकरणी न्यायालयाचा निर्णय : महिला कुस्तीपटू उच्च न्यायालयात दाद मागणार

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

महिला कुस्तीपटू लैंगिक छळवणूक प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीतील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साडेचार वर्षांपूर्वी हे प्रकरण देशभर गाजले होते. काही प्रसिद्ध महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तथापि, आरोप सिद्ध न झाल्याने सिंग यांची सन्मानाने निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दिल्लीच्या राऊझ अॅव्हॅन्यू न्यायालयाने सोमवारी हा निर्णय देत, ब्रिजभूषण सिंग यांना दिलासा दिला. त्यांच्यासह त्यांचा एक सहकारी विनोद तोमर याच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. तथापि, त्याचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी आपल्याला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली.

प्रकरण काय आहे...

भारतातील काही प्रसिद्ध आणि नवोदित महिला कुस्तीपटूंच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. या महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषण आणि लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप 2022 मध्ये केला होता. त्यावेळी सिंग हे अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. या आरोपांनंतर काही काळाने त्यांनी हे पद सोडले होते. या प्रकरणात त्यांच्यावर 15 जून 2023 या दिवशी 1,500 पृष्ठांचे आरोपपत्र दिल्लीच्या राऊझ अॅव्हेन्यू न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची रितसर हाताळणी झाली. सिंग यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारताना आपली निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंमध्ये एका अल्पवयीन कुस्तीपटूचाही समावेश होता. या प्रकरणाची संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी उमटली. या प्रकरणाचा आता निर्णय झाला असून आता दोन वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर सिंग यांची त्यांच्या एका सहकाऱ्यासह निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावेळी या प्रकरणाला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भारतभर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली.

विनेश फोगाट असमाधानी

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्यांमध्ये विनेश फोगाट या हरियाणाच्या महिला कुस्तीपटूने पुढाकार घेतला होता. सध्या ती हरियाणा विधानसभेत काँग्रेसची आमदार आहे. ‘सारी प्रशासकीय व्यवस्था सिंग यांना निर्दोष सोडण्यासाठी कार्यरत होती. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात आम्हाला यश मिळेल, अशा विश्वास फोगाट हिने पत्रकारांशी बोलताना निर्णयानंतर व्यक्त केला.

नाकारली लोकसभेची उमेदवारी

या प्रकरणाचा बोलबाला इतका झाला होता, की भारतीय जनता पक्षाचे भरवशाचे नेते असूनही ब्रिजभूषण शरण सिंग यांना 2024 मध्ये उत्तर प्रदेशातून पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या स्थानी त्यांचे पुत्र करण भूषण सिंग यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा कैसरगंज लोकसभा मतदारसंघात विजय झाला होता. राजकीय आखाड्यातही या प्रकरणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

राजकीय वळण

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधातील या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात मोठ्या  प्रमाणात पडसाद उमटले होते. महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळविलेली पदकेही गंगार्पण करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही सक्रीय पाठिंबा दिला होता. 2025 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने हा प्रमुख मुद्दा बनविला होता. तथापि, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय झालेला आहे.

न्यायासाठी...

ड न्यायालयात न्याय मिळणार, हा होता विश्वास : ब्रिजभूषण शरण सिंग

ड मुख्य तक्रारदार कुस्तीपटू विनेश फोगाट उच्च न्यायालयात दाद मागणार

ड ठोस पुरावा नसल्याने ब्रिजभूषण शरण सिंग यांची सन्मानाने मुक्तता

Advertisement
Tags :

.