सिंधुदुर्गात सैनिकी कॅन्टीन सुरु होण्यासाठी सैनिक संघटनांनी एकत्र यावे
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आवाहन
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिकी कॅन्टीन पूर्ववत सुरू व्हावी यासाठी सर्व आजी-माजी सैनिक संघटनांनी एक दिलाने एकत्र येऊन एका झेंड्याखाली एकत्रितपणे येऊन सैनिकी कॅन्टीन सुरू होण्याच्या दृष्टीने एकीचे बळ निर्माण करूया आणि सरकारला जागे करूया. यासाठी सर्व आजी - माजी सैनिक संघटनांची संयुक्त बैठक 21 जून रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी कोलगाव येथे सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला जिल्हा तसेच तालुका गावनिहाय सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे आणि या सर्व संघटनांच्या माध्यमातून राज्यात सैनिक फेडरेशनची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक कॅन्टीन लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे असे ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी खासकीलवाडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्री सावंत बोलत होते . यावेळी व्यासपीठावर जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू ताम्हणकर.,सचिव संजय सावंत, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर. ,सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष केटी परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते.