‘ब्रिजर्टन 4’ची घोषणा
नेटफ्लिक्सचा हिट शो ‘ब्रिजर्टन’ 2020 पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून याच्या चौथ्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. आता चौथ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. मागील सीझनमध्ये चौथा सीझनही दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही लोकप्रिय ड्रामा सीरिज 2026 च्या प्रारंभी दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
पहिले 4 एपिसोड्स 29 जानेवारी तर उर्वरित 4 एपिसोड्स 26 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतील. समाजाच्या रहस्यांमध्ये स्वत:ला आणखी खोलवर गाडून घेऊ शकतो, अशी कॅप्शन याच्या टीझरला देण्यात आली आहे. टीझरमध्ये बेनेडिक्ट ब्रिजर्टनला हॉलवेच्या जिन्यावरून खाली येताना दाखविण्यात आले आहे. त्यानंतर लेडी ब्रिजर्टनच्या लॅविश मस्केरेड बॉलमध्ये एका महिलेसोबत त्याची ओळख होत असल्याचे दृश्य यात आहे. या महिलेचे नाव सोफी बेक (येरिन हा) असून ती घराची मालकीण अरमिन्टा गन (केटी लेउंग)साठी काम करणारी मोलकरीण असल्याचे दिसून येते.