कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Bridal-Groom Makeup: वधुवरांच्या मेकअपवर हजारोंचा खर्च, काय आहे आपली पारंपरीक मेकअप पद्धत?

06:27 PM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

याद्वारे संपत्तीचे प्रतीक आणि दर्शनही घडवले जात आहे.

Advertisement

By : रुपाली चव्हाण

Advertisement

कोल्हापूर : विवाह सोहळ्यात वधुवरांच्या मेकअपवर हजारो, लाखो रूपयांचा खर्च होत आहे. त्यातूनच लग्नाचा एकूण खर्च, लाखों रूपयांहून अधिक असू शकतो, जो त्याच्या व्याप्ती आणि लक्झरीनुसार अवलंबून आहे. पण हा खर्च नियंत्रणात आणता येणे शक्य आहे.

आपल्याकडे विवाह सोहळ्याला धार्मिक, सांस्कृतिक महत्व आहे. त्यामुळे अनेक दिवस चालणाऱ्या या सोहळ्यांमध्ये अनेक विधी, पंरपरांचा सामावेश आहे. सोहळ्यातील पाहुण्यांश्या यादी या संख्येवरून त्याचा डामहौल निश्चित होत असतो. विवाह सोहळ्यामध्ये कौटुंबिक प्रतिष्ठा आणि आदरातिथ्य दर्शवण्यासाठी भव्य उत्सव आयोजिण्याची अपेक्षा आहे.

त्यात सोने, चांदीचे दागिने महत्वाची भूमिका बजावतात. याद्वारे संपत्तीचे प्रतीक आणि दर्शनही घडवले जात आहे. विवाह सोहळ्यात साखरपुडा, मेंहदी, संगीत, विवाह स्वागत अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो. तो खर्च दोन्ही कुटुंबाकडून करण्याची परंपरा आहे.

वधुवरांच्या मेकअपवर होणारा खर्च सर्वाधिक

भारतात लग्नाचे नियोजन करताना अनेक खर्च येतात जे प्रादेशिक परपंरा, कुटुंबाची अर्थिक स्थिती, पाहुण्यांची संख्या आणि वैयक्तिक आवडीनिवडी यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतात. वधूच्या कुटूंबाचा खर्च हा खूप असतो. वधु-वरांच्या मेकअपसाठी लागणारा खर्च हा निवडलेल्या मेकअप आर्टिस्ट मेकअप प्रकार आणि ठिकाण तसेच आवश्यक असलेल्या अतिरिक्त सेवा यावर अवलंबून असतो.

साधारणतः वराच्या मेकअपसाठी २,५०० ते ८,००० रूपये खर्च होऊ शकतो. तर वधूच्या मेकअपसाठी येणारा खर्च साधारणपणे १० हजार रूपयांपासून ते ५० हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो, या खर्चामध्ये मेकअप आर्टिस्ट व्यावसायिक मेकअप आर्टिस्टचे शुल्क सामान्यतः अधिक असल्याचे चित्र पहायला मिळते.

जुनी मेकअप पद्धती

जुनी पद्धती (पारंपरिक) यामध्ये वधूच्या मेकअपमध्ये, सौदर्यप्रसाधने नैसर्गिक आणि कमी प्रमाणात वापरली जात होगी. वधू मेकअपमध्ये लाल बिंदी, डोळ्यासाठी काजळ, ओठावर नैसर्गिक गंगाची लाल किंवा गुलाबी लिपस्टीक वापरली जात होती. वधुवर एवढा मेकअपवर खर्च करत नव्हते.

नैसर्गिक स्वतःवर हजार, पाचशे रूपये खर्च करायचे. मेहदी मेकअप हा घरच्या घरीच मैत्रिणी मिळून वधूचा सुंदर साजेसा मेकअप करायच्या. खूप कमी खर्चात जान जार पडायचे. जुन्या पध्दतीत वापरल्या जाणाऱ्या पांरपरिक सौदयप्रसाधने आणि मेकअप तंत्राची माहिती महिला नैसर्गिक रंगांचे पाण्याचे मिश्रण वापरून गालावर आणि ओठांवर रंग लावून मेकअप केला जात असे.

घरी बसून हा मेकअप केला जायचा. मेकअप अर्टिस्टकडून चाचणी न घेता लग्नाच्या दिवशी मेकअप केला जात होता. आता मात्र विवाहाला इव्हेंटचे रूप आत्याने वधुवरांच्या मेकअपवरही हजारो रूपयांचा खर्च होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मेकअपमध्ये महागडे ट्रेंड

मेकअपचे अनेक प्रकार आहेत. त्यातही सात ते आठ नवीन ट्रेंड असून यामध्ये वधूचा मेकअप तिच्या व्यक्तिमत्वावर आणि लग्नाच्या थीमनुसार निवडला जातो, काही वधू नैसर्गिक लुकसाठी जातात, तर काही वधू ठळक आणि आकर्षक लुकसाठी जातात. वधूचा मेकअप तिच्या लग्नाच्या दिक्सासाठी एक खास आणि अविस्मरणीय अनुभव बनतो. त्यामुळे यावर खर्च अधिक केला जातो.

मेकअपमध्ये विविध पध्दती

नैसर्गिक डयुई मेकअप खूप लोकप्रिय आहे. मिनिमलीस्ट लुक, मॅट मेकअप, हायलाइटर्स मेकअप, प्री ब्राइडल, स्मोकी डोळे, बोल्ड लिप्स, एअरब्रश, एचडी, हेअर स्टायिलस्ट, नो मेकअप न्यूड लुक, पारंपरिक, ग्लॅम मेकअप, हाय हेडिफिनेशन एचडी, आदी प्रकारांचा मेकअपमध्ये

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediabridal makeupgroom makeupmarraigetraditional make methodwedding ceremony
Next Article