महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देसूरमधील वीट व्यावसायिक ढगाळ वातावरणामुळे चिंताग्रस्त

09:53 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वातावरणाची साथ मिळणे आवश्यक

Advertisement

वार्ताहर /धामणे

Advertisement

देसूर ता. बेळगाव येथील वीट व्यावसायिक प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून विटा काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे येथील वीट व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. वीट व्यवसायासाठी देसूर हे बेळगाव तालुक्यातील एकमेव गाव मानले जात आहे. या गावातील मोठ्याप्रमाणात नागरिक वीट व्यवसायात गुंतले असल्याचे येथील वीट व्यवसाय धारकाने सांगितले. परंतू वीट व्यवसायासाठी लागणारी सर्व सामग्री या महागाईमुळे महागले आहे. वीटभट्टीसाठी लागणारे लाकूड, वीट काढणाऱ्यांची मजुरी, मातीचा वाहतूक खर्च आणि इतर खर्चाची बाब वाढल्याने वीट व्यावसायिक अडचणीत आले असून निसर्गाची साथसुद्धा लागते. यंदा सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे येथील सर्व वीट व्यावसायिक या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून खर्च केला आहे. आणि आता ढगाळ वातावरणामुळे सर्व व्यावसायिक चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. सध्या पाऊस न झाल्यास उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article