For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाला सुरुवात

09:51 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाला सुरुवात
Advertisement

तालुक्यातील भात मळण्यांसह ऊसतोडणीही जोमाने : पुढील दोन-तीन महिने पाऊस नसणे गरजेचे

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्मयात ग्रामीण भागातील काही गावात वीट उत्पादनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वीट उत्पादनास सुरुवात केली आहे. पुढील चार महिने वीट उत्पादन सुरू राहणार आहे. यात निसर्गाची साथ मिळणे गरजेचे आहे. तालुक्यात वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र यावर्षी शासकीय निर्बंधामुळे वीट व्यवसाय धोक्यात आला असून विटांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वीट व्यावसायिकही चिंतेत आहेत. वाळूवरील निर्बंध हटविल्यास बांधकामे सुरू झाल्यास वीट उचल मोठ्या प्रमाणात होऊन वीट व्यवसायाला चालना मिळणार आहे.

तालुक्यातील विटांना सर्वदूर मागणी

Advertisement

खानापूर तालुक्मयातील माती प्रसिद्ध असून या मातीपासून मातीची भांडी तसेच इतर साहित्यही निर्माण केले जाते. तसेच या मातीपासून घरांसाठी लागणाऱ्या भाजीव विटांसाठी खानापूर तालुका प्रसिद्ध असून या विटांचे उत्पादन गर्लगुंजी, निट्टर, इदलहोंड, गणेबैल, गंगवाळी, सावरगाळी, गुंजी, किरावळे, कामतगा, माणिकवाडी, भालके, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, चापगाव, शिवोली, हलगा, तोपिनकट्टी, बरगाव, गर्बेनहट्टी, बस्तवाड यासह इतर गावातूनही विटांचे उत्पादन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना यापासून आर्थिक मदत होते. तर काही व्यावसायिक वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात करतात. या विटांच्या भाजणीसाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड वापरले जाते. यासाठी चंदगडसह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणण्यात येते. तसेच यासाठी भाताची पोलही वापरली जाते. वीट उत्पादनासाठी मोठ्याप्रमाणात रोजगार दिला जातो. यासाठी तालुक्यासह हल्याळ, धारवाड, गोकाक, यमकनमर्डी, अळणावर यासह इतर ठिकाणाहून हजारो कामगार दरवषी खानापूर तालुक्मयात येतात. त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो. त्यातून त्यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळते. त्यामुळे बाजारपेठाही फुलल्या जातात. या वीट व्यवसायामुळे आर्थिक चलन मोठ्याप्रमाणात होत असते. त्यामुळे तालुक्यातील बाजारही तेजीत असतो.

यावर्षी अवकाळी पावसामुळे भाताची सुगी लांबणीवर पडल्याने वीट उत्पादनाला थोडा उशीरा सुरुवात झाली आहे. पुढील आठ-दहा दिवसात तालुक्मयातील वीट उत्पादनाला जोमाने सुऊवात होणार आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून काही व्यावसायिकांनी विटांसाठी आवश्यक असणाऱ्या मातीचा पुरेपूर साठा केला आहे. विटा तयार करण्याच्या कामालाही सुऊवात झाली आहे. खानापूर तालुक्मयातील वीट चांगली असल्याने या विटांना बेळगाव जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने वीट व्यावसायिक अजूनही वीट उत्पादन करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र येत्या आठ-दहा दिवसात वातावरणात बदल झाल्यावर मात्र जोमाने सुरुवात होणार आहे. यावषी पावसाने हुलकावणी दिल्याने भातपीक म्हणावे तसे झालेले नाही. त्यातच भातकापणीच्या वेळी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी भातपिकाची कापणी आणि मळणी सुरुच ठेवली असून तालुक्यातील 80 टक्के सुगी आटोपली असून काही तुरळक ठिकाणी भात कापणी आणि मळणी राहिलेली आहे. तसेच या अवकाळी पावसाचा परिणाम ऊस तोडणीवरही झालेला आहे. गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातील ऊस तोडणीची कामे सुरू झाली आहेत. जर पुढील दीड-दोन महिन्यात अवकाळी पाऊस न झाल्यास ऊसतोडणी पूर्णपणे संपणार आहे. तर वीट उत्पादनही जोमाने सुरू होऊन वीट व्यावसायिकांचाही हंगाम पुढील काही महिने मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

Advertisement
Tags :

.