For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगली जिल्हा परिषद शाळा बिलांवरील लाचलुचपत; कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

03:52 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगली जिल्हा परिषद शाळा बिलांवरील लाचलुचपत  कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला
Advertisement

                             सांगली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघड

Advertisement

सांगली - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती बिलांच्या मंजुरीसाठी ८८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग पंचायत समिती जत येथील कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) संजय भगवान सुतार (वय ५१, रा. शिवशंकर थिएटरजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याबाबत जत पोलिस ठाण्यात सुतार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतील तीन बिलांचे मोजमाप नोंदवही तयार करून कार्यकारी अभियंता, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे काम प्रलंबित होते. या मंजूर बिलांच्या रकमेवर २ टक्के प्रमाणे ७८,००० रुपये व अतिरिक्त १०,००० रुपये असे एकूण ८८,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २४ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

Advertisement

विभागाने तक्रारीची पडताळणी पंचायत समिती जत येथे करण्यात आली असता लाच मागणीची स्पष्ट झाले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी विस्तार अधिकारी निवासस्थान, पंचायत समिती जत आवारात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ८८,००० रुपयांची रक्कम स्वीकारताना संजय सुतार यांना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी जत पोलीस ठाणे
येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे तसेच पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, विना जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत, त्यांच्या पथकाने केली..

Advertisement
Tags :

.