For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरजिल्हा बदलीसाठी लाच; हेड क्लार्क व महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा

12:19 PM Jul 26, 2025 IST | Radhika Patil
आंतरजिल्हा बदलीसाठी लाच  हेड क्लार्क व महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

आंतरजिल्हा बदली करून देण्यासाठी पोलीस शिपायकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड क्लार्क आणि महिला पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संतोष मारुती पानकर (रा. कसबा बावडा) यांना अटक करण्यात आली असून, महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

यासंदर्भात रितेश मनोहर ढहाळे यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २३ जुलै रोजी ३० हजार रुपयांची रक्कम धनश्री जगताप यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.