कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Medical Advice Health News: स्तनपान भुकेपलिकडे बरेच काही, तज्ज्ञ काय सांगतात वाचा..

01:30 PM Aug 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 आईचे दूध हे बाळाच्या वाढीनुसार नेहमी बदलणारे असते

Advertisement

By : डॉ. तेजश्री तहसिलदार

Advertisement

कोल्हापूर : आईचे दूध हे नवजात बाळांसाठी जणू अमृतच! प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञात आहे. पण तरी सुद्धा समाजात बाळाला फक्त आणि फक्त स्तनपान मिळण्याचे प्रमाण कमी दिसते. त्यामुळेच स्तनपानाचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. 1 ऑगस्टपासून स्तनपान जागृतीला सप्ताहाला सुरूवात झाली आहे. 7 ऑगस्टपर्यत ही जनजागृती मोहीम सुरू राहणार आहे.

भारतात पहिल्या सहा महिन्यात फक्त आईचे दूध बाळाला देण्याचे प्रमाण (exclusive breastfeeding) केवळ 61.9 टक्के इतकेच आहे. म्हणजे इतर सर्व बाळे त्यांच्यासाठी ज्या योग्य शिशुपोषणाच्या शिफारशी आहेत, त्याला मुकतात. आईचे दूध बाळाची केवळ भूक भागवत नाही तर बाळाला शारीरिक, बौद्धिक, मानसिकरित्या परिपूर्ण बनवते.

प्रत्येक होणाऱ्या मातेला तिच्या प्रसुतीपूर्वी स्तनपानाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती असेल तर स्तनपानाचा प्रवास हा तिच्यासाठी सुखकर ठरेल. स्तनपानाकडे केवळ बाळाची भूक म्हणून न पाहता, त्याचे इतरही मुद्दे समजून घेतले पाहिजेत. आईचे दूध बाळाला सुदृढ कसे बनवते आईच्या दुधाचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे आईचे दूध हे बाळाच्या वाढीनुसार नेहमी बदलणारे असते.

याला इंग्रजीत dynamic असे म्हणतात. प्रत्येक दिवसागणिक व दिवसाच्या वेगळ्या वेळेनुसार जसे की दिवस आणि रात्र यानुसार बाळाच्या योग्य वाढीसाठी दुधातील पोषतत्त्वाची गरज बदलत जाते. बाळाच्या गरजेनुसार दुधातील वेगवेगळे घटक व त्यांचे एकमेकांशी असणारे गुणोत्तर बाळाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात बदलत जाते.

दिवसा आई च्या दुधात cortisol संप्रेरक जास्त असते तर रात्री melatonin व इतर nucleotide जास्त असतात. बाळाच्या योग्य वाढीसाठी व झोपेसाठी हे गरजेचे असते. अशा प्रकारे भिन्न गरजेनुसार आईचे दूध प्रत्येक दिवसागणीक स्वत:चे स्वरूप बदलत नेते. बदलणाऱ्या दिवसानुसार आईच्या दुधातील प्रथिने, कर्बोदके, खनिजे व इतर पोषण तत्वे यांचे स्वरूप आणि प्रमाण बदलत जाते. आईच्या दुधाचा हा गुणधर्म फार विशेष आहे.

आईचे दूध जिवंत द्रव पदार्थ (लिव्हिंग फ्लुईड) त्यामध्ये रोगाविरुद्ध काम करणाऱ्या लढाऊ पेशी असतात. ज्या विविध जीवाणू तसेच विषाणू यांवर प्रत्यक्ष हल्ला करू शकतात. उदाहरणार्थ, phagocytes, macrophages, natural killer cells, lysozyme हे सर्व घटक संसर्ग करू शकणाऱ्या घटकांना नियंत्रित ठेवून बाळाला जंतुसंसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवतात.

याव्यतिरिक्त आईच्या रक्तातील antibodies म्हणजे एखाद्या जंतुसंसर्ग रोगा विरुद्ध तयार होणारे संरक्षित घटक आईच्या दुधातून बाळाला जसेच्या तसे मिळतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे बाळांचे लसीकरण (passive immunisation) होते.

आणखी महत्त्वाचा मुद्दा असा, की बाळाच्या जन्मानंतर पहिले चिक दूध (Colostrum) जेव्हा आतड्यांना लिंपले जाते व त्यानंतर फक्त आईचे दूध (exclusive breastfeeding) पहिले सहा महिने बाळाला मिळते तेव्हा पोट आणि आतड्यांच्या जवळील रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते व परिपक्व होते (Local immunity).

त्याजागी योग्य अशा lactobacillus या जीवाणूची योग्य वाढ होते. पचन क्रिया सुदृढ होत जाते. जंतुसंसर्गपासून होणाऱ्या पोटविकारापासून बाळाला संरक्षण मिळते. म्हणूनच डॉक्टर मंडळी पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान मिळावे, असा आग्रह धरतात.

आई च्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता उत्तम असते. फक्त आईचे दूध पिणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक हा वरचे दूध किंवा पावडरचे दूध पिणाऱ्या मुलांच्या तुलनेत 8-10 गुणांनी मोठा असतो आईचे दूध पिणाऱ्या बाळाला भविष्यात लठ्ठपणा, डायबिटीस, बीपीचा त्रास, हृदय रोग यापासून संरक्षण मिळते.

आईचे दूध हे निर्जंतुक असते. याचे कारण काही तयार करावे लागण्याची कृतीच त्यात नाही. जसे पावडरचे दूध करताना वाटी, चमचा, पाणी निर्जंतुक करावीच लागते अन्यथा त्यातून जंतूसंसर्ग होऊ शकतो. पावडरचे दूध करताना प्रमाण चुकल्यास over dilution (पातळ) किंवा घट्ट होऊ शकते. आणि अशा चुका झाल्यास बाळाच्या तब्येतीला धोका पोहोचू शकतो.

Advertisement
Tags :
#pregnancy#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaexclusive breastfeedinghealth newsMedical AdviceMedical Advice Health News
Next Article