देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे संसदेच्या सुरक्षेचा भंग- राहूल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळेच संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. देशातील वाढत्या बेरोजगारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून या बेरोजगारीमुळेच संसदेमध्ये तरूणांनी घुसखोरी केली आणि त्यामुळे संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला.
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालु असताना दोन दिवसांपुर्वी लोकसभेमद्ये दोन तरूणांनी घुसखोरी करून पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या तरूणांसह त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना पोलीसांकडून ताब्यात घेऊन त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचे राजकिय पडसाद उमटताना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी हा सरकारचा नाकर्तेपणा असून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहीजे अशी मागणी करून घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेसच्या पाच आणि तृणमुल काँग्रेसच्या एका खासदाराला निलंबित व्हावे लागले.
या घटनेवर बोलताना काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, , "सुरक्षेचा भंग खरोखरच झाला आहे. पण मुद्दा हा आहे की तो का झाला? मुख्य मुद्दा बेरोजगारीचा आहे. मोदीजींच्या धोरणांमुळे भारतातील लोकांना रोजगार मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळत नाही. देशातील वाढत्या बेरोजगारीमुळेच संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला." असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.