ब्राझीलचे दोन मित्रत्वाचे सामने
वृत्तसंस्था / सावो पावलो
2026 मध्ये होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आतापासूनच अव्वल देशांनी आपल्या तयारीला जोरदार प्रारंभ केला आहे. दरम्यान जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जाणारा ब्राझील दोन मित्रत्वाचे सामने खेळणार आहे.
ब्राझीलचे हे दोन सराव आणि मित्रत्वाचे सामने फ्रान्स आणि क्रोएशियाबरोबर होतील. ब्राझील आणि फ्रान्स यांच्यातील हा सामना फॉक्स बॉरो येथे 26 मार्चला तर दुसरा सरावाचा सामना क्रोएशियाबरोबर 31 मार्चला फ्लोरिडामध्ये खेळविला जाईल. तसेच क्रोएशिया आणि कोलंबो यांच्यातील लढत ओर्लंडो येथे 26 मार्चला होणार आहे. कोलंबो आणि फ्रान्स यांच्यातील सरावाचा सामना 29 मार्चला मेरिलॅंड येथे होईल. ब्राझीलने आतापर्यंत फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा 5 वेळा जिंकली असून त्यांचा यावर्षी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सलामीचा सामना मोरोक्को बरोबर 13 जूनला न्यूजर्सी येथे खेळविला जाईल. फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा यावेळी तीन देशांनी भरविली आहे.