ब्राझीलची 2-1 ने सरशी, जपानची जोरदार झुंज
वृत्तसंस्था, ह्युस्टन : सामन्याच्या बराच काळ पिछाडीवर असलेल्या आणि अतिरिक्त वेळेचे संकट ओढवणार असे वाटणाऱ्या ब्राझीलसाठी गॅब्रिएल मार्टिनेली याने अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सामन्याच्या उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मार्टिनेलीने ‘इंज्युरी टाइम’च्या अगदी शेवटी विजयी गोल करत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला जपानवर 2-1 असा विजय मिळवून दिला आणि उपउपांत्यपूर्व फेरीमधील स्थान निश्चित केले. जपानने या सामन्यात जोरदार झुंज दिली.
उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये ब्राझीलचा पुढील सामना रविवारी न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथे आयव्हरी कोस्ट किंवा नॉर्वे यांच्याशी होईल. त्यापूर्वी 56 व्या मिनिटाला गॅब्रिएल मॅगल्हासच्या पासवर हेडरद्वारे गोल करून कॅसेमिरोने ब्राझीलला बरोबरी साधून दिली. त्याच्या दोन मिनिटे आधीच त्याने एक संधी हुकवली होती. मात्र त्यानंतर त्याने हाणलेला फटका जपानचा गोलरक्षक झिऑन सुझुकी याने पसरलेल्या हाताच्या आवाक्याबाहेरून थेट जाळीत जाऊन विसावला.
जपानसाठी कैशू सानोने मिडफील्डवर प्रतिस्पर्ध्याचा चुकीचा पास हस्तगत केला आणि चेंडू पुढे नेला. त्यानंतर 29 व्या मिनिटाला ‘हाफ-सर्कल’च्या बाहेरून उजव्या पायाने मारलेल्या त्याच्या फटक्यामुळे जपानने आघाडी घेतली. या स्पर्धेत आतापर्यंत चार गोल करणाऱ्या विनिअस ज्युनियरला 58 व्या मिनिटाला ब्राझीलला आघाडी मिळवून देण्याची संधी मिळाली होती, परंतु ‘बॉक्स’च्या डाव्या बाजूहून मारलेला त्याचा फटका सुझुकीने अडवला आणि तो गोलपोस्टच्या दुसऱ्या बाजूच्या खांबाला लागून बाहेर गेला.
दुसऱ्या सत्राच्या स्टॉपेज टाइमच्या पहिल्याच मिनिटाला कॅसेमिरो पायाला दुखापतीच्या शक्यतेमुळे मैदान सोडून गेला. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला ब्राझीलला दोन संधी मिळाल्या होत्या. पण पहिल्या संधीवर 52 व्या मिनिटाला सुझुकीने ब्रुनो गिमारेसचा हेडर अडवला. त्यानंतर लगेचच कॅसेमिरोचा हेडर एका बचावपटूच्या डोक्याला लागून सुझुकीच्या चेहऱ्यावर आदळला. सुझुकीने एकूण चार बचाव केले. ब्राझीलचा महान खेळाडू नेमार या सामन्यात खेळला नाही. जपानने विश्वचषकात कधीही बाद फेरीचा सामना जिंकलेला नाही.
बुधवारचे सामने
1) इंग्लंड वि. डीआर काँगो
वेळ : रात्री 9.30 वा.
2) बेल्जियम वि. सेनेगल
वेळ : मध्यरात्री 1.30 वा.
3) अमेरिका वि. बोस्निया-हर्झे.
वेळ : गुरुवारी पहाटे 5.30 वा.