Kolhapur : बिबट्या पकडणाऱ्या बहादुरांचा होणार सत्कार
बिबट्याला जेरबंद करणाऱ्या शूर पोलिसांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार
कोल्हापूर : बिबट्या आला म्हटल्यावर संपूर्ण कोल्हापुरकर बिथरले होते. बिबट्यामुळे कोणतीही जिवीतहानी होणार नाही, याची दक्षात घेत जीवावर उधार होत ज्या बहादूरांनी बिबट्या जेरबंद केला अशांचा सत्कार करण्यात पोलीस प्रशासन सत्कार करणार आहे. बिबट्या - पकडताना जीवाची पर्वा न करता वनविभागाचे - कर्मचारी व पोलीस पुढे गेले. बिबट्याने हल्ला - केलेल्या कृष्णा पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाटील यांनी केलेल्या याडसाने बिबट्या - माघारी फिरला अन्यथा अनर्थ घडला असता. बागेत काम करणाऱ्या माळीवरही त्यांने हल्ला केला.
जखमी डॉक्टरांच्या वैद्यकीय देखरेखमध्ये
विबट्याच्या हल्यात जखमी झालेले - कृष्णात पाटील, ओकार काटकर, तुकाराम खोदाळ, बाळू हुंबे यांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्याची काळजी म्हणून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी खबरदारी म्हणून त्यांची - काळजी घेतली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले