For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राकडून समुद्रात यशस्वी लक्ष्यभेद

06:34 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
ब्रह्मोस क्षेपणास्त्राकडून समुद्रात यशस्वी लक्ष्यभेद
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विस्तारित श्रेणीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची बुधवारी प्रथमच ‘इम्फाळ’ या युद्धनौकेवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतीय नौदलाचे नवीनतम स्वदेशी क्षेपणास्त्र विनाशक ‘इम्फाळ’ (यार्ड 12706) येथून हे हल्लाकेंद्र निर्देशित करण्यात आल्याचे नौदलाने निवेदनात स्पष्ट केले. ब्रह्मोसने समुद्रात केलेल्या पहिल्या चाचणीत ‘इम्फाळ’वरून अचूक लक्ष्य गाठले. नौदलाच्या भाषेत याला स्कोअरिंग द बुल्स आय असे म्हणतात. अशा सरावांच्या माध्यमातून नौदल कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश द्यायचा आहे. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत वाढत्या जहाजबांधणी क्षमतेची ताकदही दाखवली जाते.

Advertisement
Advertisement
Tags :

.