महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताकडून फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्र

06:10 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली तुकडी सुपूर्द : 3,130 कोटी रुपयांचा व्यवहार : चीनसोबतच्या तणावामुळे दक्षिण चीन समुद्राजवळ तैनात करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी फिलिपाईन्सला सुपूर्द केली. भारताकडून ब्राह्मोस मिळवणारा फिलिपाईन्स हा पहिला परदेशी देश आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रच्या विक्रीसाठी 375 दशलक्ष डॉलर्सच्या (3,130 कोटी ऊपये) करारावर स्वाक्षरी केली होती. भारतीय वायुसेनेने सी-17 ग्लोबमास्टर विमानाद्वारे ही क्षेपणास्त्रे फिलिपाईन्स मरीन कॉर्प्सकडे सुपूर्द केली. या क्षेपणास्त्रांचा वेग 2.8 मॅक आणि पल्ला 290 किमी आहे. फिलिपाईन्सला सोपवण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 पट जास्त आहे.

दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्स आणि चीनमध्ये तणाव वाढत असताना फिलिपाईन्सला क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली खेप प्रदान करण्यात आली आहे. या धोक्मयाचा सामना करण्यासाठी फिलिपाईन्स 3 ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तटीय भागात (दक्षिण चीन समुद्र) तैनात करणार आहे. ब्राह्मोसच्या प्रत्येक प्रणालीमध्ये दोन क्षेपणास्त्र प्रक्षेपक, एक रडार आणि कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. याद्वारे पाणबुडी, जहाज, विमानातून 10 सेकंदात दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे शत्रूवर डागली जाऊ शकतात. याशिवाय भारत फिलिपाईन्सला क्षेपणास्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देणार आहे.

चीनला भीती दाखविण्यासाठी...

अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सच्या चीनसोबत अनेक चकमकी झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिपाईन्स दक्षिण चीन समुद्रावर ही क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. यामुळे समुद्रातील फिलिपाईन्सची ताकद वाढेल आणि समुद्रात चीनच्या प्रभावावर अंकुश ठेवता येणार आहे.

कराराचा भारताला फायदा

फिलिपाईन्ससोबतच्या या करारामुळे देशाला संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनवण्यात आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल. या करारामुळे लष्करी उद्योगाचे मनोबलही उंचावेल आणि दक्षिण-पूर्व आशियातील एक विश्वासार्ह निर्यातदार म्हणूनही भारताकडे पाहिले जाईल. या करारामुळे भारत-फिलिपाईन्स संबंध मजबूत होण्याबरोबरच चीनला दोन्ही देशांमधील एकतेचा संदेश जाईल. यामुळे दक्षिण चीन समुद्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यास मदत होणार आहे.

अर्जेंटिना-व्हिएतनामकडूनही मागणी

भारताने ‘आत्मनिर्भर’ योजनेतून साकारलेली सुरक्षा उपकरणे आता अन्य देशांना निर्यात होऊ लागली आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्रे प्रथमच फिलिपाईन्सला देण्यात आली असून भविष्यात अन्य देशांनाही पुरवठा केला जाणार आहे. अर्जेंटिना, व्हिएतनामसह 12 देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. ब्राह्मोसला बाहेरील देशांतून मागणी आल्याने ही क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article