महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्राह्मण समाजाने संघटित होणे गरजेचे

11:28 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आर्थिक मागास ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट सदैव तत्पर आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे यांनी सांगितले. उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या कार्यालयात ट्रस्टच्यावतीने ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश वाटप करून ते बोलत होते. शिक्षणासाठी आर्थिक मदत मागितलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रस्टच्यावतीने मदत केली आहे. यापुढेही समाजाच्या विकासासाठी मदत करण्यात येईल. संघटित होण्यासाठी प्रत्येकाने ट्रस्टच्या कामकाजाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सचिव विलास बदामी, सहसचिव विलास जोशी, खजिनदार रमेश कुलकर्णी, नगरसेविका वाणी जोशी, माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article