For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॉर्मुला 1’मध्ये ब्रॅड पिट

06:06 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
फॉर्मुला 1’मध्ये ब्रॅड पिट
Advertisement

पुढील वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट

Advertisement

हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटचा आगामी चित्रपट ‘फॉर्मुला 1’ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोसेफ कोन्सिंस्की यांनी केले आहे. अॅप्पल ओरिजिनिल फिल्मने अधिकृत घोषणा करत चित्रपटाचे नाव ‘एफ1’ असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर याचे एक टीझर पोस्टरही जारी करण्यात आले आहे. तसेच आता या चित्रपटातील एक झलक देखील दाखविण्यात आली आहे.

वॉर्नर ब्रदर्सनी एफ1 हा चित्रपट अमेरिकेत 27 जून रोजी तर विदेशात 25 जून 2025 रोजी प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेता पिट हा माजी चालकाची भूमिका साकारताना दिसुन येणार आहे. ग्रिडवर स्वत:ची टीम एपीएक्सजीपीमध्ये स्वत:च्या सहकाऱ्यासोबत फॉर्मुला 1 मध्ये पुनरागमन करत असल्याचे दाखविले जाणार आहे. चित्रपटात केरी कॉन्डन, जेवियर बार्डेम, टोब्यास मेंजीज, सारा नाइल्स, किम बोडनिया आणि सॅमसन कायो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे निर्माते कोसिंस्की यांनी जेरी ब्रुक हायमर फिल्म्सच्या चॅड ओमानसोबत मिळून याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट फॉर्मुला 1 आणि एफ 1 समुदायाच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. यात 10 एफ1 टीम्स आणि त्यांचे चालक, एफआयए आणि रेस प्रमोटर्स सामील आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.