ग्रीन फ्यूएल इकोसिस्टमसाठी बीपीसीएलचा मुंबई बंदरासोबत करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीपीसीएलने मुंबई बंदर प्राधिकरण आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाउंडेशन (एमपीएसएफ) सोबत बंदरात ग्रीन फ्युएल इकोसिस्टम स्थापन करण्यासाठी प्रारंभिक करार केला आहे. हा सामंजस्य करार भारताला स्वच्छ ऊर्जा पर्यायाकडे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे बीपीसीएलने एका निवेदनात म्हटले आहे.
देशाच्या हवामान बदलाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देणाऱ्या हरित इंधन नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करून हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) म्हणाले, या उपक्रमांतर्गत, दोन्ही भागीदार संयुक्तपणे मुंबई बंदरात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापित करतील, जे बंदर वापरकर्त्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी हरित उर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देतील.
बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी कृष्ण कुमार म्हणाले, ‘हा सामंजस्य करार 2040 पर्यंत स्कोप-1 आणि स्कोप-2 मध्ये निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या आमच्या आकांक्षेसह एक शाश्वत ट्रेंडसाठी बीपीसीएलच्या योजनांशी सुसंगत आहे.