For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुडघ्याची शस्त्रक्रिया होताच मुलाची बदलली भाषा

06:26 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुडघ्याची शस्त्रक्रिया होताच मुलाची बदलली भाषा
Advertisement

ऐकताच कुटुंबीयांना बसला धक्का

Advertisement

एका सामान्य गुडघ्याच्या शस्त्रक्रियेने एका 17 वर्षीय मुलाच्या आयुष्यात असे वळण आले आहे की डॉक्टर्स, नर्सेस आणि परिवार सर्वांना धक्का बसला आहे. फुटबॉल खेळताना ईजा झाल्यावर या मुलाला गुडघ्याच्या ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे ऑपरेशन यशस्वी राहिले, कुठलीच गुंतागुंत निर्माण झाली नाही, परंतु अॅनेस्थीशियामधून शुद्धीत आल्यावर मुलगा केवळ इंग्रजी बोलू लागला.

हा मुलगा पूर्वी डच भाषा बोलत होता, केवळ शाळेतच तो तोडक्या मोडक्या स्वरुपात इंग्रजी बोलू शकत होता. परंतु शस्त्रक्रिया होताच तो अत्यंत अस्खलितपणे इंग्रजी बोलू लागला आहे. त्याची मातृभाषा डच पूर्णपणे गायब झाली आहे. एवढेच नाही तर तो आईवडिलांना ओळखू शकत नाही आणि वारंवार आपण अमेरिकेच्या यूटा प्रांताचा रहिवासी असल्याचे सांगत आहे.

Advertisement

अत्यंत दुर्लभ आजार

डॉक्टरांनी याला ‘फॉरेन लँग्वेज सिंड्रोम’ (एफएलएस) नाव दिले आहे. ही अत्यंत दुर्लभ न्यूरोलॉजिकल स्थिती असून यात रुग्ण अचानक स्वत:ची मूळ भषा सोडून दुसऱ्या भाषेत बोलू लागतो. वैद्यकीय साहित्यात अशाप्रकारची केवळ 9 प्रकरणे नोंद असून पहिल्यांदा एक किशोरवयीन प्रभावित झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर नर्सेसने मुलगा इंग्रजीत बोलत असल्याचे टिपले. परंतु हे पोस्ट-अॅनेस्थीशिया डिलिरियम (बेशुद्धावस्थेतून उठल्यावर होणारा गोंधळ) असल्याचे त्यांना वाटले. परंतु अनेक तास उलटून गेल्यावरही तो एकही डच शब्द न बोलल्याने डॉक्टरांनी मनोचिकित्सकाला बोलाविले. तपासणीत मुलगा रिलॅक्स्ड होता आणि डोळ्यांमध्पये संपर्क राखून होता, परंतु प्रश्नांची उत्तरे केवळ इंग्रजीत देत होता. ते देखील डच अॅक्सेंटसोबत. तो ठिकाणाविषयी गोंधळलेला होता. स्वत:ला अमेरिकेत असल्याचे समजत होता. 18 तासांनी मुलगा डच समजू लागली, परंतु बोलणे अद्याप अवघड होते. दुसऱ्या दिवशी मित्र आल्यावर अचानक तो सामान्य डचमध्ये बोलू लागला. तर तीन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

झाला नॉर्मल

फॉलोअपमध्ये आता तो पूर्णपणे नॉर्मल असल्याचे परंतु घटनेचा प्रत्येक क्षण आठवणीत असल्याचे कळले. डॉक्टरांनी याला एफएलएस मानले, कारण रुग्णाने स्वत:च्या मूळ भाषेला दाबून शाळेत शिकलेल्या दुसऱ्या भाषेचा वापर केला. एफएलएसला फॉरेन अॅक्सेंट सिंड्रोमपेक्षा वेगळे मानले जाते. एफएएसमध्ये व्यक्ती एकच भाषा बोलतो, परंतु अॅक्सेंट विदेशीसारखे वाटते, अनेकदा स्ट्रोक किंवा ब्रेन इंजरीनंतर असे घडते. एफएलएसमध्ये  पूर्ण भाषा बदलते. कारण अद्याप रहस्यम आहे. बहुतांश प्रकरणे अॅनेस्थीशिया, शस्त्रक्रिया किंवा न्यूरोलॉजिकल इव्हेंट्सनंतर होतात. अॅनेस्थेटिक औषधे ब्रेनच्या लँग्वेज सेंटरवर अस्थायी प्रभाव पाडू शकतात, यामुळे मूळ भाषा ब्लॉक होते आणि सेकंडरी लँग्वेज सक्रीय होते असे डॉक्टरांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.