For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर मिनिटाला १ रुपया पाठवतो बॉयफ्रेंड

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दर मिनिटाला १ रुपया पाठवतो बॉयफ्रेंड
Advertisement

युवतीने सांगितली ब्रेकअपनंतरही आपबीती

Advertisement

दीर्घकाळासोबत कुणासोबत नाते ठेवणे आणि मग अचानक ते तुटणे प्रत्येकासाठी अवघड काळ असतो. काही लोक याला विसरून पुढे जातात. तर अनेक जण या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत. जेव्हा एक जोडीदार नाते संपुष्टात आणण्याऐवजी दुसऱ्याला खेचत राहतो, तेव्हा हा मानसिक तणाव आणि ट्रॉमाचे कारण ठरतो. इंटरनेटवर अशाच कहाण्या व्हायरल होत असतात. ब्रेकअपंनतर देखील एक्स पार्टनर पाठलाग सोडत नाही आणि स्टॉकिंग किंवा अन्य मार्गाने त्रास देत राहतो. इंटरनेटवर एका महिलेची पोस्ट व्हायरल होत असून यात तिने स्वत:च्या एक्सच्या कृत्यांचा उल्लेख केला आहे. मी माझ्या एक्सला सर्व ठिकाणी ब्लॉक केले आहे, परंतु त्याने ऑनलाइन पेमेंट अॅप्सद्वारे दर मिनिटाला एक रुपया पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली आहे, यामुळे मला ट्रॉमाला सामोरे जावे लागत असल्याचे महिलेने म्हटले आहे.

सोशल मीडियावर महिलेची ही पोस्ट व्हायरल होत आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर मजेशीर आणि गंभीर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याला ब्लॉक करू नका, मोफत उत्पन्न मिळत आहे असे एका युजरने म्हटले आहे. एक्स पूर्ण वर्ष पैसे पाठवत राहिला तर 5,18,400 रुपये जमा होतील असे दुसऱ्या युजरने नमूद केले आहे. तर काही जणांनी याला पेन्शन स्कीमच ठरविले आहे. परंतु काही जणांनी याला गांभीर्याने घेत कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. टॉक्सिक रिलेशनशिप आणि सायबर स्टॉकिंग यासारख्या प्रकरणांमध्ये कायदेशीर पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेकअपनंतर टॉक्सिक वर्तनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी बेंगळूरमध्ये एका महिलेला असाच अनुभव आला होता, तिचा एक्स तिचे लोकेशन ट्रॅक करत फूड डिलिव्हरी अॅपद्वारे आक्षेपार्ह संदेश पाठवत होता. नाते संपुष्टात आणल्यावरही अशाप्रकारचे कृत्य करणे समोरच्याला मानसिक तणाव देते, तसेच हा प्रकार सायबर स्टॉकिंग ठरतो. अशा प्रकरणांमध्ये मदत घेणे आणि कारवाई करण्याची गरज असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.