For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | एमआयडीसी कलावती नगरात दाम्पत्य आत्महत्येप्रकरणी प्रियकरास चार दिवस पोलीस कोठडी

05:20 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   एमआयडीसी कलावती नगरात दाम्पत्य आत्महत्येप्रकरणी प्रियकरास चार दिवस पोलीस कोठडी
Advertisement

                          सोलापूर पोलिसांनी नागरिकांना सावधगीरीचा इशारा

Advertisement

सोलापूर -शहरातील एमआयडीसी परिसरातील कलावती नगरात राहणाऱ्या पती-पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या प्रियकरास न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

एके ऊर्फ अभिषेक दत्तात्रय कोरे (रा. विजयपूर, कर्नाटक, मूळ रा. सोलापूर) असे पोलीस कोठडी मिळालेल्या प्रियकराचे नाव आहे. सोमनाथ धानप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५, दोघे रा. शिरपनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. कलावती नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

Advertisement

याबाबत मल्लिनाथ धानप्पा पाटील (रा. शिरपनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सोमनाथ पाटील व श्रीदेवी पाटील यांनी राहत्या घरात कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

मृत पाटील दाम्पत्याकडे मिळालेल्या चिठठीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एके उर्फ अभिषेक दत्तात्रय कोरे याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीसांनी कोरे यास अटक केली. कोरे यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मृत श्रीदेवी पाटील यांची सोशल मीडियावर अभिषेक कोरे याच्याशी ओळख झाली होती. कोरे याने श्रीदेवी यांना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्या एकतर्फी प्रेमातून श्रीदेवी यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासातूनच पाटील दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाघमारे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य पध्दतीने वापर करावा, असे सांगितले.

Advertisement
Tags :

.