For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sexual Assault by Boxing Coach बॉक्सिंग प्रशिक्षणाच्या नावाखाली कोचने केले अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण...

02:59 PM May 23, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sexual assault by boxing coach  बॉक्सिंग प्रशिक्षणाच्या नावाखाली कोचने केले अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
Advertisement

बंगरुळच्या कांतिरवा स्टेडियमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एका अल्पवयीन बॉक्सरने (मुष्टियोद्धा) आपल्या प्रशिक्षकावर ४ वर्षांपासून लैंगिक आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगरुळच्या लायन्स बॉक्सिंग क्लबशी संबंधित एका बॉक्सिंग प्रशिक्षकावर एका १७ वर्षीय बॉक्सरने वारंवार गैरवर्तन आणि धमकावल्याचा आरोप केल्यानंतर प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

ही तक्रार पिडीत किशोरवयीन मुलीने तिच्या आईमार्फत २२ मे रोजी दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी गेल्या १० वर्षांपासून संबंधित प्रशिक्षकाकडे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे.

आरोपी प्रशिक्षक

Advertisement

संशयित आरोपीची ओळख रामचंद्रा (वय ५०) अशी पटली असून, तो त्या अल्पवयीन मुलाचा बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. तक्रारीनुसार, हा कथित छळ जवळपास चार वर्षांपासून सुरू होता आणि गेल्या पाच ते सहा महिन्यांत तो अधिकच तीव्र झाला होता.

एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, प्रशिक्षकाने कथितरित्या त्या किशोरवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि कांतिरवा स्टेडियम परिसरात अनेक वेळा तिला चुकीच्या उद्देशाने स्पर्श केला.

तक्रारीत काय म्हटले?

तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, १७ मे रोजी चेन्नईतील बॉक्सिंग स्पर्धेच्या दौऱ्यादरम्यान प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीला त्याच्या खाजगी खोलीत बोलावून तिचा लैंगिक छळ केला. एफआयआर मध्ये नोंदवल्याप्रमाणे, आरोपीने खोलीत त्या किशोरवयीन मुलीच्या गुप्तांगांना स्पर्श केला, जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले आणि तिच्याशी गैरवर्तन केले.

आरोपीने तिला, या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पॉक्सो कायदा, २०१२ च्या कलम ८ आणि १२ आणि बीएनएस, २०२३ च्या कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.