महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुष्टियोद्धा विजेंदर याचा भाजपमध्ये प्रवेश

06:34 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताला ऑलिंपिकमधील प्रथम पदक मिळवून देणाऱ्या विजेंदरसिंग या मुष्टियोद्ध्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी तो काँग्रेसमध्ये होता. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर 2019 मध्ये लोकसभा निवडणूकही लढविली होती. मात्र, त्याचा पराभव झाला होता. यंदा त्याला काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा अपेक्षाभंग झाला आहे.

Advertisement

विजेंदर सिंग हे जाट समुदायातील आहेत. या समुदायाचा राजकीय प्रभाव हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात आहे. भारतीय जनता पक्षाची या भागांमध्ये या समुदायावर भिस्त आहे. त्यामुळे विजेंदर सिंग यांचा पक्ष प्रवेश या पक्षासाठी फारच महत्वाचा मानण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा मोठा विकास होत आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहे, असे प्रतिपादन विजेंदर सिंग यांनी पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article