महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॉक्सर स्वीटी बूरा, दीपक हुड्डा यांचा भाजपप्रवेश

06:35 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था/ रोहतक

Advertisement

हरियाणात भाजपने माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. गढी सांपला किलोई येथील माजी आमदार तसेच राज्याचे माजी मंत्री कृष्णमूर्ती हुड्डा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुड्डा आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बूराने देखील भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सैनी, कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कृष्णमूर्ती हुड्डा यांनी शनिवारीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  हुड्डा हे 1991 मध्ये किलोई मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर हरियाणाच्या भजनलाल सरकारमध्ये ते मंत्री राहिले होते. 2005 मध्ये देखील त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु केवळ 11 महिन्यांनी भजनलाल यांनी स्थापन केलेल्या हरियाणा जनहित काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. काही काळानंतर ते पुन्हा काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे ते विरोधक मानले जातात. कृष्णमूर्ती यांना कुमारी शैलजा यांच्या गटाचे नेते मानले जात होते.

Advertisement
Next Article