महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर

07:35 AM Apr 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायाधीश अरविंद कुमार यांनी अंग काढून घेतले

Advertisement

नवी दिल्ली / प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होऊ शकला नाही. न्यायाधीश अरविंद कुमार यांनी यासंबंधीच्या खटल्याच्या सुनावणीपासून अंग काढून घेतल्याने याप्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. न्यायाधीश अरविंद कुमार हे कर्नाटकचे असल्याने त्यांनी स्वत:ला सुनावणीपासून वेगळे केले. आता हे प्रकरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात नवीन खंडपीठ स्थापन करतील. त्यानंतरच या प्रकरणावर पुढील सुनावणी अपेक्षित आहे. यापूर्वीही न्यायाधीश नागरत्ना यांनी आपण कर्नाटकमधील असल्याने स्वत:ला या खंडपीठामधून वेगळे केले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीची सुनावणी आतापर्यंत 10 ते 15 वेळेस  झाली आहे. गेल्या सहा महिन्यात चार ते पाच तारखा मिळाल्या, पण सुनावणी होऊ शकली नाही. 2004 मध्ये महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात गेले होते. 2014 मध्ये साक्षीöपुरावे देण्याचे आदेश न्यायालयाने दोन्ही राज्यांना दिले होते. या संदर्भात साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी जम्मू कश्मीर न्यायालयाचे न्यायाधीश मनमोहन सरीन यांची नियुक्ती केली होती.

गेली अनेक वर्ष सीमावासियांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी वारंवार लांबणीवर पडत आहे. मात्र बुधवारी सुनावणीची तारीख निश्चित झाल्यानंतर सीमावासियांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले होते. गेल्या सुनावणीत ‘कलम 12 अ’ नुसार सर्वोच्च न्यायालय यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असा दावा कर्नाटक सरकारने न्यायालयात केला होता. अचानक सुनावणीची तारीख आल्याने कर्नाटक सरकारने वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर 29 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र, सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यानंतर आतापर्यंत पाच ते सहावेळा सुनावणी पुढे ढकलली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article