कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ते’ दोन्ही गुन्हे रद्दबातल

12:03 PM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी धारवाड उच्च न्यायालयाचा निकाल

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींतर्फे धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले होते. मात्र यावेळी दगडफेक करून सरकारी वाहनांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत खडेबाजार पोलिसांनी दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांत 12 जणांवर एफआयआर दाखल केले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाद मागण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरविले आहेत. विनाकारण खोटे-नाटे गुन्हे दाखल करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना उच्च न्यायालयाने सणसणीत चपराक दिली आहे. सरिता पाटील, सुनील लोहार, रोहित माळगी, विनायक सुतार, दयानंद  बडसकर, सूरज गायकवाड, राहुल सावंत, विकी मंडोळकर, भालचंद्र बडसकर, राजेंद्र बैलूर, श्रेयस खटावकर, विनायक कोकितकर अशी गुन्ह्यांतून वगळण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Advertisement

2021 मध्ये बेळगावात कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे मंत्री महोदयांसह सर्व अधिकारी शहरातील विविध हॉटेल्समध्ये वास्तव्यास होते. याचकाळात बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याने या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौकात धरणे धरले होते. मात्र यावेळी दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. याप्रकरणी कॅम्प व खडेबाजार पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपही दाखल केले होते. मात्र पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते रद्द करण्यात यावेत, अशी याचिका यापूर्वीच अॅड. राम घोरपडे यांनी धारवाड उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार पाच खटले रद्दबातल ठरवत संशयितांना त्यातून वगळण्यात आले होते. यानंतर खडेबाजार पोलिसांनी वरील 12 जणांवर पाटील गल्ली येथील नवरत्न पॅलेससमोर पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या आणि शिवाजी रोडवरील अनुपम हॉटेलसमोर पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडल्याचा ठपका ठेवला होता. या दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक 88/2021 आणि गुन्हा क्र. 91/2021 हे देखील रद्दबातल ठरविण्यात यावेत, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या खटल्यांची शहानिशा करून दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरविले आहेत. त्यानुसार वरील कार्यकर्त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article