महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन्ही आघाड्यांकडे व्हिजनच नाही

01:28 PM Nov 09, 2024 IST | Radhika Patil
Both sides have no vision.
Advertisement

कोल्हापूर : 
महायुती आणि महाविकास आघाडीत खेळखंडोबा सुरू आहे. सुरुवातीला महायुतीने दीड हजार रुपये दिले आता महाविकास आघाडी तीन हजार देणार असल्याचे सांगत आहेत. दोन्ही आघाड्यांकडे व्हिजन दिसत नाही. खेळखंडोबा चालवला असल्याची टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

Advertisement

संभाजीराजे म्हणाले, दोन्ही आघाड्या या निवडणुकीत प्रचार करताना 2029 आणि 2034 ला काय देणार हे बोलत नाहीत, ते सोडून या दोन महिन्यात आम्ही काय देणार हे ते बोलत आहेत. दुसऱ्या राज्याला दिशा देणारा महाराष्ट्र आहे, मात्र दुर्दैवाने आजूबाजूचे राज्य आपल्यापेक्षा सगळ्या बाबतीत सगळा क्षेत्रात पुढे चालले आहेत. तिसरी आघाडीतून 121 जागा लढवत आहोत. याबद्दल स्वराज्याच्या 40 जागा आहेत. ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापिताची आहे. या मध्ये आम्ही एकही प्रस्थापित उमेदवार घेतलेला नाही. आम्ही कोणाला पाठिंबा देण्याचा आमचा प्रश्न येत नाही. स्थानिक गणितं असल्यानेच राजू शेट्टी यांनी केवळ शाहूवाडी मध्ये सत्यजित पाटील यांना आपला पाठिंबा दिला असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article