कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Politics : चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार : मंत्री हसन मुश्रीफ

11:34 AM Nov 11, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                     राष्ट्रवादींची एकजूट! चंदगडमध्ये ‘राजर्षी शाहू आघाडी’ची घोषणा

Advertisement

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रबादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष आघाडी करून राजर्षि शाहू आघाडी या नावाने निवडणूक लढणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी माजी आमदार राजेश पाटील डॉ नंदाताई बाभुळकर उपस्थित होत्या.

Advertisement

महायुती म्हणून राज्यात एकत्रीत लढण्याचे ठरविले असताना चंदगड येथे मात्र भाजपा विचारात नसल्यामुळे दुसऱ्या पक्षाला घेवून आघाडी करण्याचे ठरले आहे. भाजपा राष्ट्रवादी बरोबर बोलणारच नसेल तर जिल्हा नेता म्हणून माझी राष्ट्रवादीसाठी जबाबदारी असल्यामुळे ही आघाडी करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे पूर्वाश्रमीचे बाबासाहेब कुपेकर यांची संघटना एकत्र आल्याची पहावयास मिळत आहे. भविष्यात ही संघटना अशीच एकन राहिल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) माजी आमदार राजेश पाटील यांनी महायुतीचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीचा कोणताच प्रस्ताव आपल्याला दिला नसल्यामुळे शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या मंडळींना एकत्रीत घेऊन नगरपंचायतीसाठी आघाडी करत असल्याचे स्पष्ट केले राष्ट्र‌वादी (शरद पवार गट) बरोबरच जागामी काळात कॉंग्रेसचे नेतेही सामील होतील असे सांगत मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच चंदगड नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर दोन्ही राष्ट्रवादीत चंदगड मतदारसंघात एकत्र राहणार आहे. पुरोगामी विचारांना सर्वांना सामावून घेऊन आगामी वाटचाल करणार आहे. येत्या ३-४ दिवसात चंदगड नगरपंचायतीचे उमेदवार जाहीर करणार आहे. यावेळी मागचे उगे दुणे बाजुला ठेवत मार्गक्रम करणार असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आघाडीसाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष रामाण्या करिगार राष्ट्र‌वादीच्या (शरद पवार गट) अध्यक्ष शिवप्रसाद तेली, अमर चव्हाण, कारखान्याचे चेअरमन प्रकाश पताडे, उदयराव जोशी, सतिश पाटील, जयसिंगराव चव्हाण, भिकू गावडे, रामराजे कुपेकर, दयानंद काणेकर, मरमाण्णा गावडे, मुन्नासी नाईकवाडे, जयकुमार मुन्नोळी, दशरण कुपेकर, विकी कोफ्केरी, प्रविण वाटंगी, फिरोज मुल्ला आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
Chandgad Municipal ElectionChandgad politicsgadhinglaj newshasan mushrifKolhapur politicsMaharashtra politicsNCP Ajit Pawar GroupNCP Sharad Pawar groupRashtraShahu Aghadi
Next Article