दोन्ही मांडवी पूल 10 रोजी तात्पुरते बंद
02:55 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : डेकच्या पातळीची नियमित तपासणी आणि नोंदणी करण्यासाठी 10 मे रोजी नवीन मांडवी पूल सकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत आणि जुना मांडवी पूल सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद राहील. नवीन मांडवी पूल बंद असताना जुन्या मांडवी पुलावर (दोन्ही बाजूंनी) हलकी वाहतूक सुरू राहील. अवजड वाहतूक अटल सेतू पुलावरून वळविण्यात येईल. जुना मांडवी पूल बंद असताना नवीन मांडवी पूल (दोन्ही बाजूंनी) आणि अटल सेतू पुलावरून वाहतूक वळविण्यात येईल.
Advertisement
Advertisement