महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ अंतिम फेरीत
बंगालला नमवित पुरु ष संघ अंतिम फेरीत
हलद्वानी :
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुऊष या दोन्ही खो खो संघांनी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक दिली. जेतेपदापासून एक पाऊल दूर असलेल्या महाराष्ट्राच्या मुली अंतिम लढतीत ओडिशा संघाशी भिडतील,
महाराष्ट्राच्या महिलांनी उपांत्य लढतीत दिल्लीचा 8 गुण आणि एक डावाने (24-16) धुव्वा उडविला. नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतलेल्या दिल्लीचा महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे निभाव लागला नाही. महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे व अश्विनी शिंदे यांनी प्रत्येकी 2 मिनिटे 40 सेकंद वेळ पळती करत जबरदस्त संरक्षण केले. प्रियांकाने 6 गुणही मिळविले. याचबरोबर कर्णधार संपदा मोरे (2 मिनिटे 30 सेकंद), संध्या सुरवसे (2 मिनिटे) व गौरी शिंदे (2 मिनिटे) यांनीही संरक्षणात चोख भूमिका बजावली. दिल्लीकडून लक्ष्मी ओझा (1 मिनिट 40 सेकंद) व नंदिता प्रेमी (1 मिनिट 25 सेकंद) यांनी महाराष्ट्राच्या बलाढ्या आक्रमणाला काही वेळ प्रतिकार करून वाहवा मिळविली.
पुऊष गटात महाराष्ट्राने प. बंगालची 10 गुण व 7 मिनिटे राखून दाणादाण उडवली. महाराष्ट्राने बंगालवर फॉलोऑनही लादला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या डावात आक्रमण करावे लागल्याने डावाने विजय मिळविता आला नाही. शुभम थोरात (1 मिनिट 40 सेकंद, 2 मिनिटे पळती व 6 गुण) व सुयश गरगटे (2 मिनिटे, 50 सेकंद पळती व 6 गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. राहुल मंडल व सौरभ आढावकर यांनीही उत्कृष्ट कामगिरी करीत विजयात वाटा उचलला.