For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षणाला कंटाळून युवकाची गॅलरीतून उडी

05:33 PM Apr 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
शिक्षणाला कंटाळून युवकाची गॅलरीतून उडी
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरात बिरोडकरटेंब येथे वास्तव्यास असलेल्या तन्मय गावडे (१७ ) मूळ रा. चौकुळ, ता. सावंतवाडी या अल्पवयीन युवकाने शिक्षणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. गॅलरीतून उडी मारल्यामुळे तन्मय गावडेचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तन्मयच्या वडिलांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क करून पोलीस वाहनाने तन्मयला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु , तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा - बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तन्मयचा मृत्यू झाला. दरम्यान , आत्महत्येपूर्वी तन्मयने लिहिलेली चिट्ठी सापडली असून मला आता शिकायचे नाही. मी आत्महत्या करणार असून, माझ्या मरणास कोणाला जबाबदार धरू नये असे नमूद केले. तन्मयने उचललेल्या टोकाच्या पावलाने कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.