For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिश्र दुहेरीत बोपण्णा उपांत्य फेरीत

06:55 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिश्र दुहेरीत बोपण्णा उपांत्य फेरीत
Advertisement

अमेरिकन ओपन टेनिस : पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

भारताच्या रोहन बोपण्णाने इंडोनेशियाच्या अॅल्डिला सुत्जियादीसमवेत अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठताना प्रतिस्पर्ध्यांवर रोमांचाक विजय मिळविला.

Advertisement

बोपण्णाचा दुहेरीतील साथीदार मॅथ्यू एब्डन व झेकची बार्बोरा क्रेसिकोव्हा या चौथ्या मानांकित जोडीवर बोपण्णा-सुत्जियादी यांनी 7-6 (7-4), 2-6, 10-7 अशी मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. सुमार दीड तास रंगलेल्या या लढतीत विजयी जोडीने जिगरबाज खेळ करीत विजय खेचून आणला. बोपण्णा-सुत्जियादी यांची उपांत्य लढत अमेरिकेच्या डोनाल्ड यंग व टेलर टाऊनसेंड यांच्याशी होणार आहे.

याआधी बोपण्णा व एब्डन या दुसऱ्या मानांकित जोडीला तिसऱ्या फेरीत सोळाव्या मानांकित अर्जेन्टिनाच्या मॅक्झिमो गोन्झालेझ व आंद्रेस यांच्याकडून 6-1, 7-5 असा पराभवाचा धक्का बसल्याने जेतेपदाचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले.

Advertisement

.