कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बोपण्णा-एब्डन पराभूत

06:30 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

रोहन बोपण्णा व मॅथ्यू एब्डन या इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीचे एटीपी इटालियन ओपन स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.

Advertisement

बोपण्णा-एब्डन या द्वितीय मानांकित जोडीला इटलीच्याच सिमोन बोलेली व आंद्रेया व्हावासोरी यांच्याकडून 2-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. पहिल्या फेरीत बोपण्णा-एब्डन यांनी वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या मॅटेव अरनाल्डी व फ्रान्सेस्को पासारो यांना हरविले होते. या महिन्यात त्यांची खराब कामगिरी पुढे चालू राहिली असून माद्रिद मास्टर्स स्पर्धेतही ते पहिल्या फेरीत पराभूत झाले होते. मात्र एटीपी सर्किटवर त्यांची बऱ्यापैकी कामगिरी झाली असून त्यांनी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले तर गेल्या वर्षी इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली तर विम्बल्डनची उपांत्य व यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article