For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अस्त्र मार्क-1’ क्षेपणास्त्रे निर्मितीला चालना

06:27 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘अस्त्र मार्क 1’ क्षेपणास्त्रे निर्मितीला चालना
Advertisement

हवाई दलाकडून मंजुरी : डीआरडीओच्या मदतीने ‘बीडीएल’ करणार निर्मिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. हवाई दल भारताच्या सुखोई-30 आणि तेजस सारख्या लढाऊ विमानांसाठी अस्त्र मार्क-1 क्षेपणास्त्रांचा वापर करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही क्षेपणास्त्रे भारतातच बनवली जातील. भारतीय हवाई दलाने भारत डायनॅमिक्स लिमिटेडला स्वदेशी बनावटीची 200 ‘अस्त्र मार्क 1’ क्षेपणास्त्रे तयार करण्यास मान्यता दिली आहे. हे क्षेपणास्त्र हवेतच शत्रूला मारण्यास सक्षम आहे. ‘अस्त्र मार्क 1’ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडीओ) डिझाईन करण्यात आले असून भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे (बीडीएल) त्याची निर्मिती केली जाईल.

Advertisement

भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी नुकतीच हैदराबादला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘बीडीएल’ला क्षेपणास्त्र बनविण्यास मान्यता दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेने 2022-23 मध्ये 2,900 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. सर्व चाचण्या आणि विकास योजना पूर्ण झाल्यानंतर आता उत्पादनास मान्यता देण्यात आली आहे.

अस्त्र क्षेपणास्त्र रशियन ‘सुखोई-30’ आणि स्वदेशी ‘तेजस’ या दोन्ही लढाऊ विमानांवर तैनात केले जाईल. भारतीय हवाई दल क्षेपणास्त्रांसाठी अनेक स्वदेशी प्रकल्पांमध्ये मदत करत आहे. यामध्ये हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल हळूहळू शस्त्रनिर्मिती मोहीम पुढे नेत आहे. आता ते 130 किलोमीटरचा पल्ला असलेल्या अस्त्र मार्क-2 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहेत. 300 किमीच्या स्ट्राइक रेंजसह लांब पल्ल्याच्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी आणि विकास करण्याची योजनाही सुरू असल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.